Shubman Gill: शुभमनला पाहताच चाहत्यांना आठवली 'सारा', पण ही सारा कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शुभमनला पाहिल्यानंतर त्याचे चाहते स्टेडियममध्ये मॅच दरम्यान 'सारा, सारा' अशा घोषणा देत होते.
sara ali khan and shubman gill
sara ali khan and shubman gillSaam Tv

Shubman Gill: बॉलिवूड आणि क्रिकेट जगताचे नाते फारच जुने आहे. बऱ्याच अभिनेत्रींचे आणि क्रिकेटर्सचे लग्न झाले आहे. पुन्हा एका क्रिकेटरची आणि बॉलिवूड अभिनेत्रीची चर्चा होत आहे. शुभमन गील आणि साराच्या नावाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जबरदस्त होत आहे. नेटकरी शुभमनचे नाव सारा तेंडुलकर सोबतही आणि सारा अली खान सोबतही जोडत आहे. नुकताच एका क्रिकेट मॅचमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शुभमनला पाहिल्यानंतर त्याचे चाहते स्टेडियममध्ये मॅच दरम्यान 'सारा, सारा' अशा घोषणा देत होते.

sara ali khan and shubman gill
Chandramukhi Marathi Movie: चंद्रमुखीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'या' पुरस्काराने कमवले नाव...

नुकत्याच झालेल्या सामन्यात शुभमन गिल बॉंड्रीजवळ फिल्डिंगसाठी उभा राहिला तेव्हा, त्याच्या चाहत्यांनी साराच्या नावाचा एकच गाजा-वाजा केला. त्याने आवाज ऐकून चाहत्यांना हात देखील दाखवला. काही महिन्यांपूर्वी त्याने सोनम बाजवाच्या शोमध्ये सारा अली खानला डेट करत असल्याचे सांगितले होते. ती इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्री असल्याचेही तिने सांगितले. पण अद्यापही साराने या विषयावर मौनच बाळगले आहे. हे दोघेही देश आणि परदेशात रेस्टॉरंटमध्ये काहीवेळा एकत्र डेट करताना दिसले होते.

sara ali khan and shubman gill
Maharashtracha Favourite Kon: महाराष्ट्राची क्रश ठरली महाराष्ट्राचा 'पॉप्युलर फेस'

एका क्रिकेटच्या सामन्यातील शुभमनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओत, क्रिकेटच्या मैदानात शुभमनला पाहताच त्याचे चाहते 'सारा, सारा' अशा घोषणा देतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी, 'सारा तेंडुलकर की सारा अली खान?' असे कॅप्शन देत शुभमनला टॅगही केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. आत्ता नक्की कोण ही सारा येता काळच आपल्याला सांगेल.

शुभमनने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 208 धावा केल्या. शुभमनने आपल्या डावात शानदार षटकार ठोकले. दुसऱ्या टोकाला विकेट पडत असतानाही त्याने धावा करण्याचे सोडले नाही. 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत.

sara ali khan and shubman gill
Amitabh Bachchan Meets Messi, Ronaldo: मेस्सी-रोनाल्डोच्या भेटीसाठी बिग बी बच्चन उतरले फुटबॉल मैदानात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका ट्वीटची सध्या बरीच चर्चा होत आहे. परंतु युजर्स या मजेदार पोस्टवर खूपच रिअॅक्ट होत आहेत. त्या ट्वीटला लाखो युजर्सने पाहिले आहे. सोबतच नेटकऱ्यांनी शुभमनचे नाव सचिनच्या मुलीसोबत ही जोडले आहे.

Viral Twit
Viral TwitTwitter

सारा आणि शुभमन हे दोघे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. शुभमन हा क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करतो. तर सारा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. त्यांच्या नात्याबाबत जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com