सख्या चला लंडनच्या बागामंदी, रंग खेळू चला... सारा तेंडूलकर असं तर म्हणत नसेल ना!

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अलीकडेच साराच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी बातमी समोर आली होती, त्यानंतर तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
Sara Tendulkar
Sara TendulkarInstagram/@saratendulkar

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अलीकडेच साराच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी बातमी समोर आली होती, त्यानंतर तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. दरम्यान, सारा तेंडुलकरने काही नवीन फोटो शेअर केले आहेत. जे चाहत्यांना खूप आवडत आहेत. सारा त्या फोटोंमध्ये खूप गोड दिसत आहे. फोटोच्या लोकेशनवरून तिने हे फोटोशूट लंडनमध्ये एका बागेत केले आहे असे दिसून येत आहे.

सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. सारा तेंडुलकरने या फोटोजला Spring has sprung असे कॅप्शन दिले आहे. सारा तेंडुलकरचा हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. यासोबतच कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने सारा तेंडुलकरला ड्रीम गर्ल म्हटले, तर काही लोकांनी हार्ट इमोजीसह कमेंट केली.

24 वर्षीय सारा तेंडुलकरबद्दल सतत बातम्या येत आहेत की ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. याआधीही असे रिपोर्ट येत होते, पण त्यांना अद्याप पुष्टी मिळालेली नाही. तसे, सारा तेंडुलकरने काही ब्रँडसाठी फोटोशूट आणि जाहिरात केली आहे.

इंस्टाग्रामवरही साराचे फोटो व्हायरल होत असतात. सारा तेंडुलकरच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची (Sara Tendulkar Instagram Followers) संख्या 2 मिलियनच्या पुढे गेली आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान सारा तेंडुलकरही दिसली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com