
Vaibhavi Upadhyay Last Social Media Post: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम लोकप्रिय अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे कार अपघातात निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी अर्थात २३ मे रोजी हिमाचल प्रदेशमध्ये अभिनेत्रीचे रस्ता अपघातात निधन झाले आहे. ही ३२ वर्षीय अभिनेत्री सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. पण तिने अनेकदा सोशल मीडियावर वैभवीने फोटो आणि काही व्हिडीओ शेअर केले होते. त्यातीलच १६ दिवसांपूर्वीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीचे हिमाचल प्रदेशमध्ये कार अपघातात निधन झाले आहे. सध्या तिची १६ दिवसांपुर्वीची एक पोस्ट कमालीची चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने काही निसर्गाच्या सान्निध्यातील काही शॉर्ट्स ॲड करत ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने खूप भली मोठी पोस्ट देखील सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
पोस्टमध्ये अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशातील पर्वत, धबधबे, मंदिरे आणि रस्त्यांवरील नयनरम्य दृश्य दाखवले. यामध्ये तिने सांगितले की, हा व्हिडीओ २०१९ चा आहे, जो तिने गेल्या काही दिवसांपूर्वी पोस्ट करत शेअर केला. तसेच या संपूर्ण दृश्याचे तिने वर्णन देखील आहे. 4 वर्ष जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ती पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशमध्ये खास सफारी करण्यासाठी गेली होती. (Bollywood Actress)
वैभवी उपाध्यायची हिमाचल प्रदेशमध्ये कार अपघातात निधन झाले आहे, तिथे प्रवास करत असताना तिच्या कारचा अपघात झाला. यावेळी तिच्यासोबत गाडीत आणखी देखील काही लोकं होते. मात्र, त्यांच्याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. या अभिनेत्रीच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. तिच्या निधनाने टेलिव्हिजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तिच्या अचानक एक्झिटने तिच्या चाहत्यांना, परिवाराला आणि मित्र मंडळींना मोठा धक्का बसला आहे.
वैभवी उपाध्यायने टेलिव्हिजनसृष्टीत मोजक्याच भूमिका साकारल्या आहेत. तिने 'झिरो किलोमीटर्स', 'प्लीज फाईंड अटॅच्ड', 'साराभाई व्हर्सेस साराभाई', दीपिका पदुकोणचा चित्रपट 'छपाक', राजकुमारचा चित्रपट 'सिटीलाइट' सोबतच 'क्या कुसूर है आमरा का', 'संचना' अशा अनेक मालिकांमध्ये तिन काम केले आहे. तिच्या निधनाने टेलिव्हिजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तिच्या अचानक एक्झिटने तिच्या चाहत्यांना, परिवाराला आणि मित्र मंडळींना मोठा धक्का बसला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.