Sarla Ek Koti: चित्रपटाच्या कथेला प्रेरित होत प्रेक्षक भारावला, थेट आपल्या कन्येचं नावच ठेवलं "सरला"

चित्रपट पाहून भारावलेल्या एका प्रेक्षकानं चित्रपटातील नायिकेच्या नावावरून प्रेरित होत आपल्या नवजात मुलीचं नाव ठेवलं आहे.
Sarla Ek Koti
Sarla Ek KotiSaam Tv

Sarla Ek Koti: चित्रपट अनेकानेक कारणांनी महत्त्वाचा असतो. चित्रपटातून मनोरंजन होतंच, पण चित्रपट विचार देतो, नव्या कल्पना देतो, जगण्याची उमेद देतो, प्रेरणा देतो. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सरला एक कोटी' या चित्रपटाच्या बाबतीत एक अनोखी घटना घडली आहे. हा चित्रपट पाहून भारावलेल्या एका प्रेक्षकानं चित्रपटातील नायिकेच्या नावावरून प्रेरित होऊन आपल्या नवजात मुलीचं नावही सरला ठेवलं आहे.

Sarla Ek Koti
Bigg Boss 16: एम.सी.स्टॅन आणि शालीनमधील वाद विकोपाला, नेमकं असं काय घडलं?

सानवी प्रॉडक्शन हाऊसनं 'सरला एक कोटी' हा चित्रपट सादर केला आहे. नितीन सिंधु विजय सुपेकर यांचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम अशी दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटगृहात हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे, तसंच समीक्षकांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. मात्र चित्रपटाचं कौतुक करणारी अनोखी गोष्ट नुकतीच समोर आली.

Sarla Ek Koti
Shiv Thakare: शिव ठाकरेचं स्वप्न पूर्ण होणार? मनसेच्या अमेय खोपकरांनी पोस्ट करत म्हटलं...

"बीड जिल्ह्यातील अशोक तपसे यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालं. 'सरला एक कोटी' चित्रपट पाहून ते भारावून गेले. चित्रपटातील नायिकेच्या नावावरून त्यांनी आपल्या लेकीचं नाव ठेवलं आहे. चित्रपटाच्या टीमसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. 'सरला एक कोटी' या चित्रपटाने आणखी एक सरला जन्माला घातली." अतिशय आनंददायी अशी ही घटना असल्याचं दिग्दर्शक नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com