जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा; अंगावर शहारे आणणारा सरसेनापती हंबीरराव’चा ट्रेलर

प्रवीण तरडेंनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी उत्कृष्ट प्रकारे सांभाळली आहे. अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा; अंगावर शहारे आणणारा सरसेनापती हंबीरराव’चा ट्रेलर
Sarsenapati Hambirrao PosterInstagram/@pravinvitthaltarde

श्रेयस सावंत

मुंबई: हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’, असे म्हणत गेल्या वर्षी ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या जबरदस्त टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील एक पान उलगडणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते असलेले प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट येत्या 27 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Sarsenapati Hambirrao Marathi Movie)

Sarsenapati Hambirrao Poster
लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहितेनं 'असं' काही केलं...; पतीसह सासरची मंडळी हादरली!

प्रवीण तरडेंनी सांगितले होते की, हा मराठीतला बिग बजेट चित्रपट असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स पहायला मिळत आहे. प्रवीण तरडेंच्या पत्नीनेही यात महत्वाची भूमिका साकारलेली आहे. ट्रेलरमधील संवादही दमदार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहे, आता ट्रेलर भेटीला आला आहे त्यामुळे आणखीनच उत्सुकता आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे (Corona Lockdown) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बरेच अडथळे आले होते. त्यामुळे प्रदर्शनाला विलंब होत होता. (hambirrao marathi movie trailer)

पहा ट्रेलर-

प्रवीण तरडेंनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी उत्कृष्ट प्रकारे सांभाळली आहे. अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. त्यांची बुद्धिमत्ता चाणाक्ष होती. यामुळे या चित्रपटात हंबीरराव यांच्या नजरेतून प्रेक्षकांना मराठा साम्राज्य पहायला मिळणार आहे. (Sarsenapati Hambirrao Trailer)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.