Satara: सेकंड इनिंग, बेत, मला हिरो व्हायचंयने जिंकली रसिकांची मने

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री.छ.प्रतापसिंह महाराज सेवाधामचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सातारा रंगकर्मी, शाहुनगरी फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
vrushaliraje bhosale feliciated satara rangkarmi group in satara city recently.
vrushaliraje bhosale feliciated satara rangkarmi group in satara city recently.saam tv

सातारा : (कै.) चंद्रलेखाराजे भोसले (chandralekharaje bhosale) यांच्या जयंती निमित्त येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम आणि सातारा रंगकर्मी यांच्यावतीने शाहू कला मंदिर (satara) येथे आयाेजिलेल्या हास्यतारा या राज्यस्तरीय लघुनाटिका (स्कीट) स्पर्धेत (competition) सातारा येथील थिएटर वर्कशॉपने श्रीमंत छत्रपती सौ. चंद्रलेखाराजे भोसले करंडक पटकाविला. (vrushaliraje bhosale latest marathi news)

सातारा जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत पुणे (pune), मुंबई (mumbai), कल्याण (kalyan), पनवेल (panvel), सांगली (sangli), कोल्हापूर (kolhapur), वाई (wai), कराड (karad) आणि सातारा अशा विविध जिल्ह्यातील २१ संघांनी सहभाग नाेंदविला हाेता. या संघांनी वेगवेगळया विषयांवर दर्जेदार, मनोरंजनपर स्कीट सादर करुन सातारकरांची मने जिंकली.

vrushaliraje bhosale feliciated satara rangkarmi group in satara city recently.
Amravati: हॅलाे..! ५०० लोक हत्यारांसह दंगल घडविणार; अफवेचा फोन करणारा अटकेत

सेकंड इनिंगने पटकाविला प्रथम क्रमांक

या स्पर्धेत सांघिक विजेतेपद प्रथम क्रमांक सेकंड इनिंग (थिएटर वर्कशॉप, सातारा), व्दितीय क्रमांक – बेत (आर्टिस्टिक राइट्स, पुणे), तृतीय क्रमांक - मला हिरो व्हायचंय (सतरंगी सातारकर, सातारा) यांनी मिळवले.

वनराज कुमकर ठरले उत्कृष्ट अभिनेते

वैयक्तिक पारितोषिकामध्ये उत्कृष्ट अभिनेता - वनराज कुमकर (सेकंड इनिंग), उत्कृष्ट अभिनेत्री सुजाता चव्हाण (सेकंड इनिंग), उत्कृष्ट लेखक डॉ. मिलिंद सुर्वे (सेकंड इनिंग), उत्कृष्ट दिगदर्शक सुहास चव्हाण (हिजडे है हम) यांनी मिळवले. निलेश महिगावकर आणि सिध्देश्वर झाडबुके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आगामी काळात विविध उपक्रम

स्पर्धेतील यशस्वीतांना ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले, श्री.छ. प्रतापसिंह महाराज सेवाधामच्या अध्यक्षा वृषालीराजे भोसले (vrushaliraje bhosale) आणि मान्यवरांच्या हस्ते पारिताेषिक (prize) देण्यात आले. यावेळी वृषालीराजेंनी आगामी काळात विविध उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली.

Edited By : Siddharth Latkar

vrushaliraje bhosale feliciated satara rangkarmi group in satara city recently.
Akshaya Tritiya: दगडूशेठ हलवाई, गणपतीपुळे, पंचमुखी गणेशास आंब्यांची आरास (व्हिडिओ पाहा)
vrushaliraje bhosale feliciated satara rangkarmi group in satara city recently.
Udayanraje Bhosale: पुणे- सातारा- कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करा : उदयनराजे भाेसले
vrushaliraje bhosale feliciated satara rangkarmi group in satara city recently.
पहिली ते नववीचे सर्व विद्यार्थी पास; शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com