
Allegation On Satish Kaushik's Wife: दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी निधन झाले. होळी खेळून आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला आणि हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर दिल्लीतील एका महिलेने दावा केला होता की, पैशाच्या वादामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना मारलं आहे. त्यानंतर सतीश कौशिक यांच्या पत्नीने त्या महिलेविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
आता या प्रकरणात सतिश कौशिक यांची पत्नी शशी हिच्या तक्रारीवर अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टानं त्या महिलेला समन्स जारी केलं आहे. कोर्टाचं म्हणणं आहे की सतिश कौशिक यांच्या हत्येचा कथित दावा, प्राथमिक तपासात मानहानीचा अपराध वाटत आहे. (Latest Entertainment News)
शशी कौशिक यांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला आहे की दिल्लीत राहणारी सानवी हिला सिद्ध करायचं आहे की सतिश कौशिक यांचे डॉन दाऊद आणि त्याच्या मुलासोबत संबंध होते, ही एक रचलेली कहाणी आहे.
आता या प्रकरणात कोर्ट १५ जूनला पुढील सुनावणी करणार आहे. दिल्ली येथे राहणारी महिला सानवी मालू सोबतच राजेंद्र छाबरा या व्यक्तिला देखील या प्रकरणात समन्स जारी केलं गेलं आहे.
कौशिक यांची पत्नी शशीनं गेल्या महिन्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की सतिश कौशिक यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे आणि यात कोणत्याही कटाचा समावेश नाही.
सतिश कौशिक यांच्या पत्नीनं तक्रार करताना असं देखील म्हटलं आहे की महिलेनं केलेले दावे खूप अपमानास्पद आहेत आणि कौशिक यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी हे सगळं केलं आहे.
सतिश कौशिक हे एक यशस्वी दिग्दर्शक,पटकथाकार,लेखक आणि अभिनेता होते. अर्थात महिलेनं केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य आढळलेलं नाही. पण आता या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देतं याचं उत्तर १५ जूनला मिळेल.
सतीश कौशिक यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. सतीश यांचे मित्र अनुपम खेर यांना मित्राच्या आठवणीत भावुक झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.