टायगर श्रॉफला पाहून चाहती बेशुद्ध, अभिनेत्याने स्टेजवर बोलावलं अन्...

tiger shroff
tiger shroffsaam tv

मुंबई : तरुणाईला बॉलिवूड (Bollywood) आणि अनेक सेलिब्रिटींची क्रेझ आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम प्रयत्नात असतात. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger shroff) याची देखील तरुण-तरुणींमध्ये कमालीची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्या फिटनेसमुळे टायगर तरुणींमध्ये विशेष लोकप्रीय आहे. अलिकडेच टायगरने त्याच्या आगामी चित्रपट 'हिरोपंती २'च्या (Heropanti 2) प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र, यावेळी टायगरला पाहून त्याची चाहती असलेल्या तरुणीला चक्कर आली. विशेष म्हणजे या तरुणीला अशाही अवस्थेत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

tiger shroff
Bhool Bhulaiyaa 2 Trailer: मंजुलिकाच्या एन्ट्रीनं उडवला काळजाचा थरकाप!

सध्या सोशल मीडियावर टायगर आणि त्याच्या चाहतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये टायगरने मुंबईतील एका कार्यक्रमात आपल्या आगामी 'हिरोपंती २'च्या (Heropanti 2) प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री तारा सुतारियादेखील (Tara Sutaria)त्याच्यासोबत होती. विशेष म्हणजे या प्रमोशनमध्ये टायगरला पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. यात एका चाहतीला टायगरला पाहून चक्कर आली आणि बेशुद्ध पडली.

या कार्यक्रमात टायगर श्रॉफचा फॅन असलेल्या तरुणीला त्याला समोर पाहून चक्करच आली आणि ती बेशुद्ध झाली. यानंतर कार्यक्रमाच्या टीममधील लोकांनी तिची काळजी घेतली. त्यानंतर टायगरनेही त्या चाहतीला स्टेजवर बोलावून गळाभेट भेटली आणि तिच्याशी संवाद साधला. टायगरची एक झलक पाहता यावी यासाठी ही तरुणी कित्येक तासांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे टायगरला पाहिल्यानंतर तिला चक्कर आली. मात्र, टायगरला जवळून भेटल्याशिवाय ही तरुणी इथून हलायला तयार नव्हती. परिणामी, टायगरने तिला मंचावर बोलवून तिची गळाभेट घेतली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com