बंगाली अभिनेत्री पल्लवी डे च्या मृत्यू प्रकरणात लिव्ह-इन-पार्टनर शग्निक गोत्यात

रविवारी ती तिचा मित्र शग्निक चक्रवर्तीसोबत राहत असलेल्या दक्षिण कोलकाता येथील तिच्या घरात रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आली होती.
Pallavi Dey | Shangnik Chakraborty
Pallavi Dey | Shangnik ChakrabortySocial Media

कोलकात: लोकप्रिय बंगाली अभिनेत्री पल्लबी डे हिच्या मृत्यूप्रकरणी (Actress Pallavi Dey Death) कोलकाताच्या गरफा पोलिसांनी तिचा लिव्ह-इन-पार्टनर शग्निक चक्रवर्तीला अटक केली आहे. पल्लबीच्या कुटुंबीयांच्या वतीने कोलकाता येथील गरफा पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शग्निक चक्रवर्ती (Shangnik Chakraborty) आणि त्याचा साथीदार एंड्रिलाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. सोमवारी शग्निकची पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. त्यानंतर त्याला आज अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, रविवारी ती तिचा मित्र शग्निक चक्रवर्तीसोबत राहत असलेल्या दक्षिण कोलकाता येथील तिच्या घरात रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आली होती. तेव्हापासून तिचे कुटुंबीय शग्निकवर सातत्याने आरोप करत होते. पल्लबीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शग्निक चक्रवर्तीला आर्थिक फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पल्लबीच्या पालकांनी शग्निकवर फसवणूक, मानसिक छळाचे आरोप केले होते.

Pallavi Dey | Shangnik Chakraborty
Beed: हनुमान चालीसा अन् भोंग्यात अडकलेल्या राजकारण्यांना 'ही' एकात्मता दिसणार?

शग्निकने पल्लबीला मानसिक नैराश्यात ढकल्याचा आरोप

पल्लबीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पल्लबीच्या पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालात आत्महत्येची बाब समोर आली असली तरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होईपर्यंत खून झाल्याची शक्यता पल्लबीच्या पालकांनी व्यक्त केली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर लिव्ह-इन पार्टनर शग्निकवर आरोप होऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी शग्निक चक्रवर्तीला बोलावून रात्रभर चौकशी केली.

पल्लबीला सध्या काम मिळत नसल्याचे शग्निकने चौकशी दरम्यान सांगितले. यामुळे ती मानसिक नैराश्यात होती, मात्र तिच्या कुटुंबीयांनी त्यास नकार दिला आहे. पल्लबीला तुलनेने कमी काम मिळत असले तरी मानसिक नैराश्याला बळी पडले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com