Pathaan Movie: चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनाही 'पठान'ची भुरळ, सोशल मीडियावर पोस्ट करत केले तोंडभरून कौतुक

Shah Rukh Khan: शाहरुखच्या दमदार अ‍ॅक्शन आणि चित्रपटाच्या कथेची सर्वजण प्रशंसा करत आहेत.
Pathaan Poster
Pathaan PosterSaam Tv

Bollywood Celebrities Reaction On Pathaan: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचा फिव्हर चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्समध्ये देखील पाहायला मिळत आहे. सर्वजण शाहरुखच्या दमदार अ‍ॅक्शन आणि चित्रपटाच्या कथेचे कौतुक करत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने 'पठान'ला बॉक्स ऑफिसवरील धमाका म्हणत चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अॅक्शन हिरो हृतिक रोशन आणि विकी कौशल यांनीही 'पठान'चे कौतुक केले आहे. या चित्रपटातील शाहरुख खानच्या अॅक्शन सीन्सने सर्वांनाच प्रभावित केले आहे.

Pathaan Poster
Sania Mirza Viral Video: टेनिस कोर्टवर पराभवानंतर सानियाला अश्रू अनावर; पाणावलेल्या डोळ्यांना ग्रँड स्लॅम स्पर्धेला निरोप

आलिया भट्टने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टवर आलियाने लिहिले की, 'कारण प्रेम नेहमीच जिंकते. क्या धमाका है' आलिया भट्टने पोस्टरवर तीन फायर इमोजी देखील शेअर केले आहेत.

अभिनेता विकी कौशलनेही शाहरुख खानचे कौतुक केले. विकीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर थिएटरमधून क्लिक केलेला फोटो शेअर केला आहे. विकीने पोस्टवर लिहिले आहे की, 'तुम्ही आम्हा सर्वांना पुन्हा चित्रपटांचा भाग बनण्याचे स्वप्न दाखवले' विकीने शाहरुख खानचे आभार मानले आणि रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे.

Alia Bhutt And Vicky Kaushal Post On pathan
Alia Bhutt And Vicky Kaushal Post On pathanSaam Tv

तसेच बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनने पठानचे कौतुक करत ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलेआहे की, 'किती अप्रतिम चित्रपट आहे, अविश्वसनीय दृश्ये, यापूर्वी कधीही न पाहिलेले दृश्य, कडक स्क्रीन प्ले, उत्तम संगीत, आश्चर्यकारक ट्विस्ट, सिड तुम्ही ते पुन्हा एकदा केले आहे. तुमच्या कामाने मला आश्चर्यचकित केले. शाहरुख, दीपिका, जॉन आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.

'पठान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत आहे. पठानने 2 दिवसात 100 करोडचा आकडा गाठला आहे. वीकेंडला हा चित्रपट 200 कोटींचा आकडा पार करू शकतो, असे मानले जात आहे. शाहरुखचे दमदार अॅक्शन सीन्स पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com