King Is Back: शाहरुख- सलमान पुन्हा एकदा दिसणार एकत्र, 'पठान'मधील 'हा' सीन होतोय व्हायरल...

शाहरुखसोबत 'पठान'मध्ये बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान असणार अशी चर्चा होती अन् अखेर...
Shahrukh khan and salman khan image
Shahrukh khan and salman khan imageSaam Tv

Pathaan Film Scene: अखेर शाहरुखचा 'पठान' चित्रपट अनेक गोष्टींचा सामना करत अखेर आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या तरुणांसह सर्वांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. शाहरुखसोबत 'पठान'मध्ये बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान असणार अशी चर्चा होती. अखेर हे निश्चित झालंय.

Shahrukh khan and salman khan image
Pathaan Leaked in HD: या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर लीक झाला शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठान'

शाहरुख- सलमानचा 'पठान' मधला एक सीन सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झालाय. या दृष्यात सलमान त्याच्या खास टायगर अवतारात पठान म्हणजेच शाहरुखला मदत करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सलमान खानच्या एंट्रीला टाळ्या आणि शिट्यांचा कमाल माहोल थिएटरमध्ये झाला होता. टायगर ची खास म्युझिक सलमानच्या एंट्रीला वाजली. अन् दोघेही खान बंधू दुश्मनांवर तुटून पडले.

Shahrukh khan and salman khan image
Bollywood Celebrity In Pathaan Review: चाहत्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींनाही शाहरुखच्या 'पठान'ची भुरळ...

शाहरुख - सलमानचा हा जबरदस्त अंदाज त्यांच्या फॅन्सला चांगलाच भावला असून हा चित्रपट प्रेक्षकांचा पैसा वसूल करत मनोरंजन करणार यामध्ये काडी मात्र शंका नाही. 'पठान' च्या निमित्ताने यशराज फिल्मस स्पाय युनिव्हर्स तयार करत आहे. 'पठान' मध्ये अखेर सलमानची एन्ट्री झाली असल्याने चाहत्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे.

Shahrukh khan and salman khan image
Shah Rukh Khan: चाहत्यानं शाहरुखला विचारली अपूर्ण इच्छा, किंग खाननं दिलं 'हे' उत्तर...

लवकरच सलमान- शाहरुखसोबत वॉर फेम अभिनेता हृतिक रोशनसुद्धा सहभागी होणार आहे. आता पु्न्हा एकदा सलमान- शाहरुख- हृतिक या तिघांना एकत्र पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'पठान' नंतर सलमानच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटात शाहरुख आणि हृतिक एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा, सलमान खान सोबत अनेक स्टार्स असणार आहेत.दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यश राज फिल्म्स प्रॉडक्शन अंतर्गत हा चित्रपट निर्मित करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com