Mannat Nameplate: मन्नत बंगल्याच्या हिरेजडीत नेमप्लेटचे गौरी खानने सांगितले सत्य

गेल्या काही दिवसांपासून मन्नतच्या नेमप्लेटचीही चर्चा होत आहे.
Shah Rukh Khan House Had Diamond Nameplate
Shah Rukh Khan House Had Diamond NameplateSaam Tv

Gauri Khan Gave Update On Mannat: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' ही मुंबईमधील एक प्रतिष्ठित वस्तू आहे. मुंबईला भेट देणारे अनेकजण शाहरुखचा बंगला बघायला आवर्जून जातात आणि बाहेरून त्याचे फोटो काढतात. यावरून शाहरुखच्या चाहत्यांची त्याच्या प्रति असलेली क्रेझ दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून मन्नतच्या नेमप्लेटचीही चर्चा होत आहे.

या वर्षी मे महिन्यात, सोशल मीडियावर शाहरुखच्या घराबाहेर फोटो क्लिक करणाऱ्या अनेक चाहत्यांच्या लक्षात आले होते की मन्नतची नेमप्लेट दिसत नाही. त्यानंतर नेमप्लेट दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आहे होते. अलीकडेच चाहत्यांनी मन्नतच्या बाहेरचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि या फोटोंमध्ये नेमप्लेट पुन्हा दिसत आहे. पण यावेळी लोकांच्या नजरेत एक नवीन गोष्ट आली.

Shah Rukh Khan House Had Diamond Nameplate
Rowdy Bhati Accident: सोशल मीडिया स्टार रावडी भाटीचे अपघाती निधन, झाडावर कार आदळून मृत्यू

शाहरुखच्या घरी एक नवीन नेमप्लेट दिसू लागली आहे आणि ती पूर्वीपेक्षा वेगळी आहे. मन्नतच्या या नवीन नेमप्लेटमध्ये खूप चमक आहे आणि ती नवीनही दिसते. मन्नतच्या नेमप्लेटमध्ये हिरे जडलेले आहेत अशी बातमी पसरली होती. पण आता या नेम प्लेटचे नवीन सत्य समोर आले आहे, जे खुद्द शाहरुखची पत्नी गौरी खानने शेअर केले आहे. (Shah Rukh Khan)

गौरी खानने इंस्टाग्रामवर तिचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. जो मन्नतच्या गेटवर क्लिक करण्यात आला आहे. या फोटोमध्ये गौरी पांढऱ्या टॉप आणि ब्लू डेनिमवर ब्लॅक ब्लेझर घालून पोज दिली आहे. फोटोमध्ये गौरी नवीन नेमप्लेटल टेकून उभी आहे. (Viral Photo)

फोटोच्या कॅप्शनमध्ये गौरीने लिहिले की, 'तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा एंट्री पॉइंट आहे. त्यामुळे नेमप्लेट सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. आम्ही नेमप्लेटसाठी काचेच्या क्रिस्टल्ससह पारदर्शक सामग्री निवडली आहे. जी सकारात्मक, उत्साहित आणि शांत वातावरण देते. #GauriKhanDesigns. गौरी स्वतः एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे आणि तिच्या पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या हॅशटॅगवरून असे दिसून येत आहे की तिने स्वतःच नेमप्लेट डिझाइन केली आहे. (Social Media)

गौरी खानचा मन्नतच्या बाहेरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट करून धुमाकूळ घातला आहे. एका यूजरने गौरीला 'मन्नतची राणी' म्हटले, तर दुसरा हसणाऱ्या इमोजीसह म्हटले आहे की, 'मॅडम तुम्हीही शाहरुखच्या घराबाहेर फोटो काढला. एका यूजरने लिहिले की, 'हे खरे हिरे नाहीत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.' (Celebrity)

गौरी खान फक्त डिझायनर नाही नसून शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटचे कामकाज देखील ती पाहते. ही कंपनी पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्याआधी शाहरुखचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुख या चित्रपटातून 5 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. (Movie)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com