
Pathaan: 'पठान' चित्रपटासाठी प्रत्येकजण खूपच उत्सुक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्कंठा कमालीची वाढली आहे. अशा परिस्थितीत पठानच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सध्या अॅडव्हान्स बुकिंग कमाई पाहता चित्रपट कशी कमाई करेल याचा तर्क लावता येतो. चित्रपटाचा मॉर्निंग शो देखील लावण्याची आता निर्मात्यांनी तयारी दर्शवली आहे.
किंग खान तब्बल 5 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने सर्वांनाच चित्रपटाची उत्सुकता आहे. आता चाहत्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी मोठे पाऊल उचलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म स्टुडिओने निर्मित केलेल्या शाहरुख खानच्या 'पठान'चा मॉर्निंग शो सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे निर्मात्यांनी 'पठान'चा शो सकाळी 6 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पठानचा मॉर्निंग शो हा चित्रपट भारतात 'IMAX 2D, CGV Korea 4DX 2D, DBOTech 2D, PVR Cinema PA XL आणि CG Cinema ICE 2D' मध्ये दाखवला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांची ही अनोखी भेट चाहत्यांसाठी खूप महत्वाची मानली जात आहे.
सुपरस्टार शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठान' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे. 25 जानेवारीला 'पठान' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.