Pathan Advance Booking: सांगलीनंतर आता अमरावतीतही शाहरुखचा जबरा फॅन; 'पठान' चित्रपटासाठी केले थिएटर बुक

अमरावती येथील शाहरुखच्या फॅन क्लबने 'पठान' चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहण्यासाठी अख्ख थिएटर बुक केले आहे.
Shah Rukh Khan Fan Club
Shah Rukh Khan Fan Club Instagram @srkfcamravati

अमर घटारे

Shah Rukh Khan Fans Book Theater: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. यामुळे त्याचे फॅन्स खूपच उत्साहित आहेत. शाहरुखचे फॅन्स वेगवेगळ्या पद्धतीने शाहरुखवरील त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. अमरावती येथील शाहरुखच्या फॅन क्लबने 'पठान' चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहण्यासाठी अख्ख थिएटर बुक केले आहे.

दीपिकाच्या भगव्या बिकिनीमुळे चर्चेत आलेला शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाउसफुल होतांना दिसतोय. शाहरुखच्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर येथील एका चाहत्यांने 'पठान' चित्रपटाचे पहिल्या शोसाठी चक्क अख्ख थिएटर बुक केले आहे.

Shah Rukh Khan Fan Club
SS Rajamouli: 'बाहुबली' दिग्दर्शक एसएस राजामौलींच्या जीवाला धोका, राम गोपाल वर्मांच्या दाव्याने खळबळ

एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. 'पठान'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने ‘'पठान' पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलं आहे. अमरावतीमधील एसआरके फॅनक्लबने थिएटरचं बुक केलं आहे. या फॅन क्बलचा फाऊंडर चांदूर रेल्वे शहरातील आशिष उके हा आहे. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी बुधवारी सकाळी ९ ते १२ वाजताचा शो बुक केला आहे.

फॅन क्लबचा फाउंडेर आशिष उके यांनी म्हटले आहे की, 'शाहरुख खानचा चित्रपट ४ वर्षाच्या मोठ्या काळानंतर प्रदर्शित होत आहे. आम्ही २०० हुन अधिक फॅन्स एकत्र चित्रपट पाहणार आहोत. या चित्रपटाचे देशभरात अॅडव्हान्स बुकिंग सुरु आहे. देशातील टॉप ३ नॅशनल चैनमध्ये बॉलीवूडमधील सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग करणारा चित्रपट 'पठान' ठरला आहे.

आम्ही हा दिवस खूप उत्साहात साजरा करणार आहोत. 'पठान' चित्रपट १०० पेक्षा अधिक देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. शाहरुख आणि दीपिका यांची केमिस्ट्री आम्हाला खूप आवडते. ही केमिस्ट्री पुन्हा बघण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत. शाहरुखला आम्ही ट्विटद्वारे याबद्दल सांगितले आहे. तसेच त्याने आमच्या ट्विटला उत्तर देखील दिले आहे.

शाहरुखच्या सांगलीतील एका फॅनने देखील त्याच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'साठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे. १०० तिकिटांसह त्याने सुद्धा त्याचा फोटो ट्विट केला होता आणि शाहरुख खानला टॅग केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com