
सध्या ‘जवान’ची सर्वच ठिकाणी प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपटातील गाण्यांची, चित्रपटाच्या कथेची, चित्रपटातील डायलॉगची आणि सेलिब्रिटींची प्रचंड चर्चा होत आहे. सध्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करण्याच्या रेस मध्ये आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल १० चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला. शाहरुखसोबत या चित्रपटामध्ये साऊथची तगडी स्टारकास्ट सोबत मराठमोळी अभिनेत्री देखील आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत पहिल्या दिवसापासूनच क्रेझ पहायला मिळत आहे. सध्या शाहरुखच्या एका फॅनची प्रचंड चर्चा होत आहे.
सध्या सोशल मीडियावर शाहरुखच्या फॅनचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा त्याचा फॅन व्हेंटिलेटरवर असून खास शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी तो थिएटरमध्ये पोहोचला. सध्या शाहरुखच्या या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे. चित्रपट पहाताना तो चाहता कमालीचा खुश दिसत होता.
रोहित गुप्ता नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून अनीस फारूकी असं या शाहरुखच्या चाहत्याचं नाव आहे. त्याची प्रकृती खराब असताना सुद्धा तो चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेल्यामुळे त्याची प्रचंड चर्चा होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून शाहरुखच्या या फॅनची प्रचंड चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एकंदरित चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी २१ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात चित्रपटाने आतापर्यंत ६९६ कोटींचा टप्पा गाठला आहे. शाहरुखसोबतच नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. (Entertainment News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.