Shahrukh Khan Mannat Bungalow: किंग खान शाहरुखचा 'मन्नत' हिऱ्यांनी सजला

शाहरुखचा बंगला 'मन्नत' हे मुंबईतील प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे.
Shah Rukh Khan House Had Diamond Nameplate
Shah Rukh Khan House Had Diamond NameplateSaam Tv

Shah Rukh Khan House Had Diamond Nameplate: बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार शाहरुख खानने याच्या मुकुटात आणखी दोन हिरे जोडले गेले आहेत. परंतु हे हिरे त्याचा कामाचे नसून त्याच्या बंगल्यावरचे आहेत. शाहरुखचा बंगला 'मन्नत' हे मुंबईतील प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे. आता त्यांनी त्यांच्या या बंगल्यासाठी हिरे जडित नेमप्लेट बनवून त्यांच्या बंगल्याची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.

'चक दे!' इंडियाच्या काही फॅन क्लबनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर नेमप्लेटची छायाचित्रे शेअर केली आहेत. आधीच्या नेमप्लेट बदलल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी ही हिरे जडित नेमप्लेटची झलक पाहण्यासाठी मन्नत येथे गेले होते.

Shah Rukh Khan House Had Diamond Nameplate
HanuMan Teaser: प्रशांत वर्माचा पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

फोटोमध्ये डाव्या बाजूला मन्नत आणि उजव्या बाजूला लँडसेंड लिहिलेले दोन डायमंड नेमप्लेट्स दिसत होत्या. पूर्वी एक ब्लॅकबोर्ड होता ज्यावर मन्नत लँडसेंड असे लिहिले होते. लँडसेंड लिहिण्याचे कारण म्हणजे सी फेसिंग हा बंगला वांद्रे येथील बँडस्टँडच्या शेवटच्या भागात आहे. (Photo)

शाहरुख अनेकदा त्याच्या बाल्कनीतून त्याच्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी त्या बालकनीमध्ये येत असतो. 2 नोव्हेंबर रोजी त्याच्या वाढदिवसाला तो चाहत्यांना भेटण्यासाठी बालकनी गेला होता. नवीन नेमप्लेट बसवल्यानंतर चाहत्यांकडे आता त्याच्या बंगल्याजवळ जाऊन फोटो काढण्याचे अजून एक कारण मिळाले आहे. (Shah Rukh Khan)

Shah Rukh Khan House Had Diamond Nameplate
Shah Rukh Khan House Had Diamond NameplateSaam Tv

शाहरुखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचे तीन बिग बजेट चित्रपट प्रदर्शनासाठी प्रतीक्षेतआहेत. ज्यापैकी पहिला चित्रपट यशराज फिल्म्सचा 'पठान' हा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून 4 वर्षांच्या विश्रांतीनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. याव्यतिरिक्त, त्याच्याकडे राजकुमार हिरानीचा 'डंकी' चित्रपट आहे. ज्यामध्ये तो तापसी पन्नूसह दिसणार आहे. दक्षिणेकडील दिग्दर्शक अॅटलीच्या 'जवान'मध्येही शाहरुख दिसणार आहे. (Movie)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com