
शाहरुख खानचा आणि नयनताराचा ‘जवान’ चित्रपट काल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाआधीच सोशल मीडियावर चर्चेत राहिलेल्या चित्रपटाची भुरळ फक्त चाहत्यांवरच नाही तर अनेक सेलिब्रिटींना देखील पडली आहे. चित्रपटाला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी बुकिंग केलं होतं. चित्रपटाला पहिल्याच दिवशी सर्वत्र मिळणारा प्रतिसाद पाहता, या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे, याचा अंदाज नुकताच सॅकल्निकने बांधला आहे.
शाहरुखच्या ‘जवान’ला फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतात शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी कास पहाटेपासूनच थिएटरबाहेर तिकीटासाठी लांबच्या लांब मोठी रांग लावली होती. अनेक चाहत्यांनी चित्रपटाचे तिकीटे अक्षरश: ५०० ते २००० रु विकत घेतले आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधूनच या चित्रपटाने बक्कळ कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट पहिल्या दिवशी किती गल्ला जमवेल याचा अंदाजे आकडा समोर आला आहे.
सॅकल्निकच्या अहवालानुसार, हिंदी भाषेमध्ये या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला जमावला आहे, तर तमिळ भाषेमध्ये या चित्रपटाने ५ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर तेलुगू भाषेमध्येही या चित्रपटाने ५ कोटी कमावले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकूण ७५ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटातील शाहरुखच्या अभिनयाने, त्याच्या लूकने, शाहरुख आणि विजय सेथुपतीच्या भूमिकेने चित्रपटाला चारचाँद लावले आहेत. चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहिला तर, शाहरुख खानच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाने भारतासह जगभरात पहिल्याच दिवशी १२० कोटींचा एकूण गल्ला जमवल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल १० चित्रपटांचा विक्रम मोडीत काढला आहे.
‘जवान’च्याआधी अनेक चित्रपटांनी विक्रम मोडीत काढले. पण सध्याचा आकडा पाहता ॲटली दिग्दर्शित या चित्रपटाने तब्बल १० चित्रपटांचा विक्रम मोडीत काढलाय. पठानने पहिल्या दिवशी ५७ कोटी कमावले होते केजीएफ २ ने ५३.९५ कोटींची कमाई केली होती. वॉरने ५३.३५, ठग्स ऑफ हिंदोस्तानने ५२.२५, हॅपी न्यू इयरने ४४.९७, भारतने ४२.३०, बाहुबली २ ने ४१ कोटी, प्रेम रतन धन पायो ने ४०.३५ कोटी तर गदर २ ने ४०.१० कोटींची कमाई केली होती. तर सुल्ताननेही पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींचा आकडा गाठला होता.
चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. चित्रपट ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.