Pathaan OTT Release: ‘अखेर ठरलं...’ ‘पठान’च्या ओटीटी रिलीजची तारीख अन् वेळ ठरली

बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरलेला हा सिनेमा ओटीटीवर कधी येतो, याची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. तर त्याच सर्वांसाठी आता आनंदाची बातमी आहे.
Pathaan On OTT
Pathaan On OTTSaam Tv

Pathaan On OTT: सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठान’ चित्रपटाने २०२३ वर्षाच्या सुरूवातीलाच बॉक्स ऑफिसवर चांगालच धुमाकूळ घातला. या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिकचा पल्ला गाठला असून जगभरात १००० कोटींहून अधिकचा पल्ला गाठला आहे. बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरलेला हा सिनेमा ओटीटीवर कधी येतो, याची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. तर त्याच सर्वांसाठी आता आनंदाची बातमी आहे. अखेर ‘पठान’ लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे.

Pathaan On OTT
Salman Khan: सलमानच्या जीवाला धोका... मुंबई पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ; नेमकं काय आहे प्रकरण?

शाहरुखच्या ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. 25 जानेवारीला प्रदर्शित झालेला ‘पठान’ तुफान गाजला. ‘पठान’ मुळे बॉलिवूडला आलेली मरगळ गेली आहे, आता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या मनात असलेली इच्छा अखेर पुर्ण झाली आहे.

शाहरुख, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कंपाडिया यांची मुख्य भूमिका असलेला ‘पठान’ आता अमेझॉन प्राईमवर (Amazone Prime Video) प्रदर्शित होणार आहे. ‘पठान’ची OTT प्रदर्शनाची तारीख सुद्धा निश्चित झालीय. ‘पठान’ची विस्तारित आवृत्ती म्हणजेच Extended Version 22 मार्च 2023 ला OTT प्लॅटफॉर्म Amazone Prime Video वर रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘पठान’ घरबसल्या सर्वांना पाहता येणार आहे.

Pathaan On OTT
Shiv Thakare: शिव ठाकरेचे सलमान खान बद्दलचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत,“सलमान यांची इमेज रियल लाइफमध्ये...”

‘पठान’ सिनेमा चित्रपटगृहातील आणि ओटीटीवरील यामध्ये फारच साम्य दिसणार आहे. यामध्ये ‘पठान’वर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. शाहरुखच्या चाहत्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘पठान’ची विस्तारित आवृत्ती पाहायला मिळणार आहे. ‘पठान’ हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. ‘पठान’मधून त्याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com