'मी माझ्या बापाचं नाव लावतो.. शाहरुख काय संपुर्ण बॉलिवूड माझं काही बिघडवू शकत नाही'
Shahrukh KhanSaamTV

'मी माझ्या बापाचं नाव लावतो.. शाहरुख काय संपुर्ण बॉलिवूड माझं काही बिघडवू शकत नाही'

'21 वर्षांचा मुलगा जो बॉर्डरवर उभा रहातो आणि दहशतवाद्यांची गोळी लागून मरतो तो माझा नायक आहे. शाहरुख नाही आणि आर्यन पण नाही.'

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी (Actor Vikram Gokhale) कंगना रणौतने (Kangana Ranaut) केलेल्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याशी आपण सहमत असल्याचं म्हटल्यांने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते आणि त्यामुळे अनेकांनी गोखलेंवरती देखील टीका केली. तसेच या सर्व प्रकरणामध्ये आपली बाजु स्पष्टपणे मांडण्याकरिता त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये आपण आपल्या वक्तव्यावरती ठाम असल्याचं म्हणत कंगनाच्या त्या वक्तव्याच पुन्हा समर्थन केलं शिवाय त्यांनी शाहरुख खानच्या (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) बाबतीतही वक्तव्यं केलं.

हे देखील पहा -

विक्रम गोखलेंनी आज अनेक मुद्दाांवरती परखड भाष्य केलं यावळी 'आर्यन खान आणि शाहरुख खानबाबत जे चालू आहे ते क्षुल्लक आहे; शाहरुख काय बॉलिवूड (Bollywood) मधला कोणीही माझा काही बिघडवू शकत नाही. मी माझ्या बापाचं नाव लावतो. तो विषय अत्यंत फालतू विषय होता.' शिवाय ड्रग्ज (Drugs) हा विषय नव्हता माझ्या वाढदिवशी हे प्रश्न विचारायला. अशा अत्यंत परखड शब्दात त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Shahrukh Khan
2014 पासूनच सामान्य भारतीयाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या वक्तव्यावरती मी ठाम; विक्रम गोखलेंच स्पष्टीकरणं

शिवाय 21 वर्षांचा मुलगा जो बॉर्डरवर उभा रहातो आणि दहशतवाद्यांची गोळी लागून मरतो तो माझा नायक आहे. शाहरुख नाही आणि आर्यन पण नाही, राष्ट्राबाबत विचार करताना असे अनेक महत्वाचे विचार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com