Shah Rukh Khan: शाहरुखच्या डोक्यात चाललंय तरी काय? 'पठान' चं प्रमोशनचं करणार नाही, 'या' कार्यक्रमांना दिला नकार...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठान' च्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावेल अशी अपेक्षा होती. पण आता त्यानेच त्या शोमध्ये येणार की नाही याबद्दलचा खुलासा केला आहे.
Shah Rukh Khan Twitter
Shah Rukh Khan Twitter Saam Tv

Shah Rukh Khan: 'द कपिल शर्मा शो' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतात कपिल शर्माच्या शोमध्ये येतात. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठान' च्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता शाहरुख खान त्या शोमध्ये येणार की नाही याबद्दलचा खुलासा केला आहे.

Shah Rukh Khan Twitter
Alia Bhatt Pregnancy : आलिया भट्ट दुसऱ्यांदा प्रेग्नंट? 'त्या' व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

नेहमीच चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी शाहरुख खान अनेकदा #AskSRK च्या माध्यमातून ट्वीटरवर चाहत्यांसोबत संवाद साधतो. चाहते सोशल मीडियावर शाहरुखसोबत मनमुराद गप्पाही अनेकदा मारतात. मुख्य म्हणजे किंग खानसुद्धा त्याच्या चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देतो.

अलीकडेच एका चाहत्याने शाहरुखला विचारले, " सर कपिल शर्माच्या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कधी येताय." चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, 'भाऊ, मी थेट चित्रपटगृहात येईन, तिथे भेटू.'

Shah Rukh Khan Twitter
Ved Box Office Update:'वेड'ची चाहत्यांना भूरळ कायम, चौथ्या आठवड्याची दमदार सुरूवात...

'पठान' चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. शाहरुख खान आपल्या चित्रपटांचे नेहमीच प्रमोशन करत असतो, मात्र तो 'पठान'बाबत शांत असून प्रमोशनसाठी ही कुठे बाहेर जात नाही. माध्यमांनाही यावेळी शाहरुखने मुलाखती दिल्या नसून कोणत्याही शोला सुद्धा त्याने यावेळी हजेरी लावली नाही.

त्याला थेट चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधायचा आहे. सोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरुख 'बिग बॉस १६'मध्ये येणार असल्याच्या चर्चा होत होत्या पण तो तिथेही दिसणार नाही.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com