ऑनलाईन जाहिरातीच्या जाळ्यात अडकली शाहिद कपूरची पत्नी
ऑनलाईन जाहिरातीच्या जाळ्यात अडकली शाहिद कपूरची पत्नीInstagram

ऑनलाईन जाहिरातीच्या जाळ्यात अडकली शाहिद कपूरची पत्नी

शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) कदाचित थेट चित्रपटसृष्टीशी संबंधित नसेल, पण तरीही तिची फॅन फॉलोव्हिंग एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.

शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) कदाचित थेट चित्रपटसृष्टीशी संबंधित नसेल, पण तरीही तिची फॅन फॉलोव्हिंग एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. मीराच्या पोस्ट्स दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात, त्यामुळे ती चर्चेत असते. अलीकडेच मीराची एक पोस्ट इंटरनेटवर बरीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्यासोबत झालेल्या ऑनलाइन फसवणूकीविषयी सांगत आहे. (Shahid Kapoor's wife caught in online advertising trap)

ऑनलाईन जाहिरातीच्या जाळ्यात अडकली शाहिद कपूरची पत्नी
ऑनलाईन जाहिरातीच्या जाळ्यात अडकली शाहिद कपूरची पत्नीInstagram

मीराने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत ज्यात एक फोनचा कव्हर भीषण स्थितीत दिसत आहे. या अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत तसेच माहिती दिली आहे की तिने स्लिंग फोन कव्हर ऑर्डर केले होते. पण जेव्हा याची डिलिव्हरी झाली तेव्हा ते दाखवल्याप्रमाणे नव्हते. मीराने या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

मिराने लिहिले आहे की तिने स्लिंग कव्हर ऑर्डर केले होते जेणेकरून वर्कआउट दरम्यान फोन ठेवणे सुलभ होते, परंतु आलेल्या कव्हरने तिला खूप अस्वस्थ केले आहे. फोटो शेअर करताना मीराने लिहिले की, 'मी एका मूर्ख जाहिरातीच्या जाळ्यात पडले आणि हे फोन कव्हर विकत घेतले. परंतू, फोटोमध्ये ज्या पद्धतिने दाखवले आहे त्यासारखे आलेले कव्हर मुळीच तसे नाही'.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com