Pathaan Movie Collection : बॉक्स ऑफिसवर 'पठान'चाच डंका; पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी, रचला इतिहास

रिलीजच्या पहिल्याच दिवशी जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 'पठाण' हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.
Pathan Box Office Collection
Pathan Box Office CollectionSaam TV

Pathaan movie Collection : शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठान' हा चित्रपट बुधवारी (25 जानेवारी) प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल अशी अपेक्षा वर्तवली जात होती. घडलं सुद्धा तसंच पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत इतिहास घडवला आहे. (Latest Marathi News)

Pathan Box Office Collection
Baba Ramdev : लवकरच पाकिस्तानचे ४ तुकडे होतील, त्यातील तीन.., बाबा रामदेव यांचा मोठा दावा

रिलीजच्या पहिल्याच दिवशी जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 'पठाण' हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. 'पठान'चे पहिल्या दिवशीचे एकूण कलेक्शन 106 कोटी रुपये इतके झाले आहे, त्यापैकी 69 कोटी रुपये एकट्या भारतातील बॉक्स ऑफिसवर मिळाले आहेत. तर 35.5 कोटींची कमाई परदेशातून झाली आहे.

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्विटनुसार, शाहरुख खान (Shah Rukh Khan) 'पठान'ने उत्तर अमेरिकेतून $1.5 दशलक्ष (रु. 12 कोटींहून अधिक) गल्ला जमवला आहे. यूके आणि युरोप बॉक्स ऑफिसमधून 650 हजार डॉलर्स (5 कोटी रुपयांहून अधिक) कमावले आहेत.

'पठान'ला गल्फ मार्केटमधून $1 दशलक्ष (रु. 8.1 कोटी) पेक्षा जास्त कमाई अपेक्षित आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपलाच डंका वाजवला आहे. पठाणमुळे इतर चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

'वॉर' 'केजीएफ 2'चे रेकॉर्ड तोडले

'पठान'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हृतिक रोशनच्या 'वॉर' आणि यशच्या 'केजीएफ 2'चे रेकॉर्ड तोडले आहेत. वॉरने पहिल्या दिवशी सुमारे 50 कोटी कमावले होते. तर 'KGF 2' ने 52 कोटींची कमाई केली होती. आता तर पठानने पहिल्याच दिवशी तब्बल 100 कोटींचा गल्ला जमवला आहे.

आता पहिल्या वीकेंडला हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान'मध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू भाषेतही प्रदर्शित झाला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com