SRK- Salman Khan: 'तुम्हाला लाजा वाटतं नाहीत का...?' व्हायरल ट्विटमुळे सलमान- शाहरुखवर संतापले नेटकरी; पाहा काय आहे प्रकरण

अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना जोरदार ट्रोल केले आहे.
Shahrukh khan and salman khan image
Shahrukh khan and salman khan imageSaam Tv

Bollywood News: शुक्रवार (३०, डिसेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे दुःखद निधन झाले. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच मनोरंजन जगतातील अनेकांनी सोशल मीडियावरुन पंतप्रधानांच्या आईला श्रद्धांजली वाहिली. यामध्ये बॉलिवूडमधूनही दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना जोरदार ट्रोल केले आहे.

Shahrukh khan and salman khan image
Year Ender 2022: बारा महिने 12 भानगडी; कोणी गाजवले 2022? वाचा वर्षात घडलेल्या भन्नाट घडामोडींचे किस्से

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हिराबा मोदी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. वयाच्या १०० व्या वर्षी हिराबा मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र बॉलिवूडमधून अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर एका दिवसांनी म्हणजे ३१ डिसेंबरला सलमान खान आणि शाहरुख खान यांनी ट्विट केले. यामुळेच त्यांना नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले आहे.

पंतप्रधानांच्या आईला एका दिवसानंतर श्रध्दांजली वाहिल्याने सलमान (Salman Khan) आणि शाहरुख खानवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. यामध्ये सलमान खानवर टीका करताना "नेटकऱ्यांनी २७ तारखेची उतरली नव्हती का?" असे म्हणत जोरदार टीका केली आहे त्याचबरोबर आणखी एका युजरने "आजपासून तुझे चित्रपट कधीही पाहणार नाही," असेही सलमानला सुणावले आहे.

Shahrukh khan and salman khan image
New Year 2023 : मद्य प्रेमींनो राहा सावधान; पोलिसांसह, राज्य उत्पादन शुल्क विभागाची असणार नजर, घ्या 'ही' काळजी

त्याचप्रमाणे नेटकऱ्यांनी शाहरुख खानवरही जोरदार टीका करताना कोणत्या नशेत असता असा प्रश्न विचारत, "तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? ज्या देशात खाता तिथेच घाण करता, म्हणून तुम्हाला आम्ही देशद्रोही म्हणतो," अशा शब्दात जोरदार टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com