Shah Rukh Khan Launches Gauri Khan's Book: मन्नत कसं घडलं? बायको गौरीच्या बुक लाँचच्या वेळी शाहरुखने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा

Gauri Khan's Coffee Table Book: गौरी खानने माय लाइफ इन डिझाइन नावाचे कॉफी टेबल बुक लॉन्च केले आहे.
Actor Shah Rukh Khan launches Gauri Khan's coffee table book
Actor Shah Rukh Khan launches Gauri Khan's coffee table bookInstagram @gaurikhan_style

Shah Rukh-Gauri Khan Untold Stories: शाहरुख खान आणि गौरी खान बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. गौरी खान प्रत्येक कठीण प्रसंगी शारुखच्या पाठीशी ठामपणे उभी होती. जीवनातील प्रत्येक चढ-उतारावर त्यांनी एकमेकांची साथ दिली आहे. शाहरुखने १५ मे रोजी गौरीचे कॉफी टेबल बुक लाँच केले. दरम्यान शाहरुखने त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खुलासे केले आहेत. गौरी खानाविषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या त्याला आवडतात.

यासोबतच शाहरुख खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी सांगितले. शाहरुख म्हणाला की, 'जेव्हा त्याच्याकडे घर डिझाइन करण्यासाठी डिझायनर देण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा गौरी खानने 'मन्नत' डिझाइन केले.'

गौरी खान शाहरुखची पत्नीच नाही तर प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर देखील आहे. तिची स्वतःची इंटिरियर डिझायनिंग कंपनी आहे. आता गौरी खानने माय लाइफ इन डिझाइन नावाचे कॉफी टेबल बुक लॉन्च केले आहे. या पुस्तकात गौरी खानने इंटिरिअर डिझायनर म्हणून तिचा प्रवास दाखवला आहे. (Latest Entertainment News)

Actor Shah Rukh Khan launches Gauri Khan's coffee table book
OTT Release This Week: मे महिन्याचे पुढील पंधरा दिवस तुफान गाजणार; भोला, बंदा, सिटी ऑफ ड्रीम सारखी मनोरंजनाची मेजवानी मिळणार

लॉन्च इव्हेंटमध्ये शाहरुखने सांगितले की, गौरी खानचे इंटिरियर डिझायनर म्हणून पदार्पण त्यांच्या घरातून 'मन्नत'मधून झाले आहे. शाहरुख म्हणाला, 'आम्ही घर विकत घेतलं तेव्हा आम्हाला ते खूप आवडलं होतं. पण ते आमच्या आवाक्याबाहेर होतं. पण मी दिल्लीचा असल्यामुळे मुंबईतील अपार्टमेंट बंगल्यापेक्षा महाग आहेत असे मला वाटले नाही.

या बंगल्यापूर्वी आम्ही ताज लँड्स एंड येथील एका घरात राहत होतो. ते माझ्या दिग्दर्शकाचं घर होतं. त्यांनी आम्हाला राहण्यासाठी ते घर दिले आणि 'जोपर्यंत आम्ही चित्रपट बनवत आहोत तोपर्यंत तुम्ही त्यात राहू शकता', असे सांगितले. 'तेव्हा आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. पैसे आल्यावर आम्ही तो बंगला विकत घेतला.'

शाहरुख पुढे म्हणाला, 'पण बंगला विकत घेऊनही आमच्या आवाक्याबाहेर होता. खरेदी करणे ही वेगळी बाब आहे, पण तो अशा मोडकलेल्या अवस्थेत होता की त्याची डागडुजी करण्यासाठी आणखी पैशांची आवश्यकता होती. ते सुसज्ज करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते.

मग आम्ही डिझायनरला फोन केला, पण त्याने सांगितले की खर्च इतका आहे की तेव्हा माझा पगारही इतका नव्हता. मग मी गौरीची मदत घेतली. मी गौरीला म्हणालो की तुझ्यात एक कलाकार आहे, मग तू डिझायनर का होत नाहीस? अशा प्रकारे मन्नतच्या डिझायनिंगला सुरुवात झाली. आम्ही जे काही पैसे कामवायचो त्याने मन्नतसाठी वस्तू विकत घ्यायचो.

शाहरुखने गौरीचे पुढे कौतुक केले आणि सांगितले की, तिने पत्नी ते आई आणि आता वर्किंग वुमनची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. शाहरुख म्हणाला, 'मी आणि गौरी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आणि जेव्हा हे घडते तेव्हा आपण एकमेकांचे काम गृहीत धरू लागतो. एकमेकांचे कौतुक करत नाही.

मी जे काही करत आहे, ते खूप दिवसांपासून करत आहे. पण गौरीनेही तिची भूमिका खूप छान साकारली आहे. आम्ही मिळून तीन मुलं वाढवली. ती एक चांगली पत्नी आणि चांगली आई आहे. पण गौरीला काहीतरी करायचे पॅशन होते. तिच्यात कलात्मकता होती'.

'खरं तर आमच्या कुटुंबातील प्रत्येकामध्ये थोडीफार क्रिएटिव्हिटी आहे. सुरुवातीला आम्ही मुंबईत स्थायिक होण्यासाठी धडपडत होतो. मग, माझ्या प्रोफेशनमुळे, सामान्य जीवन जगणे आणि मुलांचे संगोपन करणे या दरम्यान गौरीचे काही पॅशन असेल हे लक्षात आले नाही. पण हे पुस्तक त्या सर्वांसाठी आहे असे मला वाटते. हे अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात काही गोष्टी राहून जातात किंवा हाताबाहेर जातात.

पण या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बिझी शेड्युल असूनही आम्ही सगळे एकत्र जेवतात. शाहरुखने सांगितले की, त्याच्या घरातील सर्वात बिजी व्यक्ती गौरी खान आहे. शाहरुखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर लवकरच त्याचे 'डंकी' आणि 'जवान' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com