जखमी शाहरुख, चेहऱ्यावर बँडेज; 'जवान'चा टीझर प्रदर्शित

चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते.
जखमी शाहरुख, चेहऱ्यावर बँडेज; 'जवान'चा टीझर प्रदर्शित
Shahrukh Khan Saam Tv

मुंबई - चाहते शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते. कारण शाहरुख शेवटचा 2018 मध्ये झिरो चित्रपटात दिसला होता. शाहरुख आता पुन्हा एका धमाकेदार चित्रपटातून कमबॅकची करणार आहे. तो बॅक टू बॅक त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणा करत आहे. पठाण आणि डंकीनंतर आता शाहरुखने आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. शाहरुखच्या नवीन चित्रपटाचे नाव जवान आहे. ज्याचे दिग्दर्शन अ‍ॅटली कुमार करणार आहे.

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या आगामी चित्रपटचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. 1 मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये , शाहरुखने त्याच्या डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे. तसेच हातात मशीन गन धरुन एका गुप्त ठिकाणी बसला असल्याचे दिसून येत आहे. टीझरमधला शाहरुखचा लूक प्रेक्षकांना चकित करणारा आहे. शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीजच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'जवान' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Shahrukh Khan
Amravati: वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित, नागरिक त्रस्त

जवान हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. जवान हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. पॅन इंडिया स्तरावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. टीझरमध्ये चाहत्यांना शाहरुख खान अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुखचा हा अ‍ॅक्शन अवतार नक्कीच चाहत्यांची मनं जिंकणार आहे.जखमी शाहरुखच्या चेहऱ्यावर बँडेज, 'जवान'चा टीझर पाहिलात का?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com