Aryan Khan: आर्यनच्या पहिल्या बॉलिवूड डेब्यूसाठी शाहरूखची पोस्ट चर्चेत; म्हणाला...

शाहरूखने देखील आर्यनच्या कामाचे कौतुक करत त्याला एक सल्ला दिला आहे.
Aryan Khan
Aryan KhanSaam TV

Aryan Khan: आर्यनखान बॉलिवूड डेब्यू करत आहे हे समजल्यापासून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत या बद्दल माहिती दिली आहे. अशात आपल्या मुलाने बॉलिवूडच्या मायानगरीत पहिले पाऊल ठेवल्याने शाहरूख खान आणि गौरी खान दोघेही फार खुश आहेत. आर्यनने पोस्ट केलेल्या फोटोवर शाहरूखने कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. आता त्याने दिलेली कमेंट देखील चांगलीच चर्चेत आली आहे. (Latest Marathi News)

मुलांच्या चांगल्या कामगिरीने प्रत्येक पित्याची मान अभिमानाने उंचावते. शाहरूखने देखील आर्यनच्या कामाचे कौतुक करत त्याला एक सल्ला दिला आहे. शाहरूखने लिहिले आहे की, "व्वा..विचार..विश्वास, स्वप्ने सत्यात उतरतील त्यासाठी फक्त हिम्मत पाहिजे. पहिल्या प्रोजेक्टसाठी माझ्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत." असे शाहरूख म्हणाला. आर्यन देखील यावर लगेचच प्रतिक्रिया देत लिहिले की, "धन्यवाद सेठ..., तुम्ही अचानक सेटवर भेटायला याल याची मी वाट पाहत आहे. तर शाहरूखने म्हटले आहे की, " दुपारची शिफ्ट असेल तर खुप बरं होईल, सकाळाची शक्यतो नको."

Aryan Khan
Ashok Chavan's Daughter Enters Politics : अशोक चव्हाणांची कन्या राजकारणात, पाहा सविस्तर बातमी

शाहरूख प्रमाणेच आई गौरी खानने देखील यावर कमेंट केली आहे. तिने यात लिहिले आहे की, "तुला भेटण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. " यासह अनेक चाहत्यांनी आर्यनच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरूखने बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी कमवली. त्याच्या दमदार अभिनयामुळेच किंग खान म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. अशात आता आर्यन त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनय नाही तर दिग्ददर्शक (Director) आणि लेखक ( writing) म्हणून झेप घेऊ पाहत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com