Shamshera: लग्नानंतर रणबीर कपूरचा महाभयंकर अवतार होतोय व्हायरल, फॅन्स हादरलेच

शमशेराचा पोस्टर सोशल मीडियावर लीक झाल्यापासून चाहते रणबीर कपूरचा लूक बघून अचंबित झाले आहेत. शमशेराचा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्टर तुफान चर्चेत आला आहे.
Shamshera: लग्नानंतर रणबीर कपूरचा महाभयंकर अवतार होतोय व्हायरल, फॅन्स हादरलेच
Ranbir Kapoor' Shamshera Poster ImageSaam Tv

मुंबई : अभिनेता 'रणबीर कपूर'च्या (ranbir kapoor) 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची जसे प्रेक्षक वाट बघत आहेत, त्याचप्रमाणे प्रेक्षक रणबीरच्या अजून एका चित्रपटाची म्हणजे 'शमशेरा'(Shamshera) या चित्रपटाची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढवत निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला, मात्र आता सोशल मीडियावर 'शमशेरा'चा पोस्टर सुद्धा लीक झाला आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर एका रागीट अवतारात दिसत आहे. सोशल मीडियावर लीक झालेला हा पोस्टर कितपत खरा आहे, यावर काहीही सांगणे कठीण आहे, कारण शमशेराच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.

Ranbir Kapoor' Shamshera Poster Image
जीव गुंतला...! सिद्धार्थ-कियाराचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल, एकमेकांमध्ये...

शमशेराचा पोस्टर सोशल मीडियावर लीक झाल्यापासून चाहते रणबीर कपूरचा लूक बघून अचंबित झाले आहेत. जसं शमशेराचा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर सोशल मीडियावर पोस्टर तुफान चर्चेत आला आहे.

Ranbir Kapoor' Shamshera Poster Image
राखी सावंतला आठवली तिची चूक; ...अन् मग बॉयफ्रेंडसमोर चेहरा लपवून पळाली

नेटकरी रणबीर कपूरचा पोस्टर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करत आहे.तसेच या पोस्टरवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत. चित्रपटात रणबीर एका दरेडोखोराचं पात्र साकारत आहे. या पोस्टरमध्ये पण त्याचा लूक हिंसक वाटत आहे. नेटकरी हा पोस्टर बघून रणबीरचे कौतुक करत आहेत. तर काही नेटकरी या पोस्टरमधील रणबीरच्या लूकची तुलना हॉलिवूड मधील चित्रपट 'थॉर : लव एंड थंडर'च्या पोस्टरसोबत करत आहेत.

या पोस्टरमध्ये लांब केस ,मोठी आणि दाट दाढी, मळकट कपडे आणि त्याच्या हातात कुऱ्हाड अशा वेशात रणबीर कपूर खूप क्रूर दिसत आहे. या पोस्टर बाबतीत अशी शंका वर्तवली जात आहे की, ही अधिकृत पोस्ट नसून रणबीर कपूरच्या चाहत्यांनी तयार केलेली पोस्ट असू शकते. करण मल्होत्राने दिग्दर्शित केलेला शमशेरा हा चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com