Kaun Banega Crorepati 14 : करोडपती होण्यासाठी तयार आहात? या दिवशी होणार अमिताभ बच्चन यांच्या शो प्रीमियर

टीव्ही वरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'ची चाहते दीर्घकाळापासून वाट पाहत आहेत. या शोमध्ये अनेक स्पर्धक येऊन सहभागी होतात आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विजेते होतात.
Kaun Banega Crorepati will start Soon
Kaun Banega Crorepati will start SoonSaam Tv

मुंबई : टीव्ही वरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'(Kaun Banega Crorepati)ची चाहते दीर्घकाळापासून वाट पाहत आहेत. या शोमध्ये अनेक स्पर्धक येऊन सहभागी होतात आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विजेते होतात. आता लवकरच महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) पुन्हा एकदा त्यांच्या वर्षानुवर्षे लोकप्रिय शोमध्ये लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येत आहेत. म्हणजेच प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची सुवर्ण संधी आहे. 'लेडीज' आणि 'जंटलमेन' म्हणत पुन्हा एकदा बॉलिवूडचे मेगास्टार धमाकेदार एन्ट्री घेणार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे आता या शोच्या प्रीमियरची तारीख देखील जाहीर झाली आहे.

Kaun Banega Crorepati will start Soon
ananya movie review : महाराष्ट्राची क्रश असलेल्या हृता दुर्गुळेचा स्वप्नपूर्ती करायला शिकवणारा 'अनन्या' चित्रपट प्रदर्शित

आता प्रेक्षकांना 'कौन बनेगा करोडपती'च्या १४ व्या सीझनसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. आजपासून १३ दिवसांनी हा शो टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या शोचा नवा प्रोमो रिलीज करून निर्मात्यांनी नुकतीच चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रोमो पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की या शोचे निर्माते त्यांच्या प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज आहेत.

Kaun Banega Crorepati will start Soon
VIDEO : चाहत्यांना भेटण्यासाठी कार्तिक आर्यनने सोडले 'शेहजादा'चे शूटिंग, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

सोनी टीव्हीवर प्रोमो शेअर करताना निर्मात्यांनी जाहीर केले आहे की हा शो रविवार, ७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. या शोसह स्वातंत्र्याचा महान उत्सवही या दिवसापासून साजरा करयला सुरुवात होणार आहे. केबीसी १४ च्या नवीन प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन देखील याच गोष्टीचा उल्लेख करताना दिसत आहेत. प्रोमोची सुरुवात आमिर खानपासून होते. यानंतर येतो कारगिल युद्धातील शूर सैनिक, डी.पी. सिंग, जे सांगतात की त्यांच्या शरीरावर अजूनही किती शत्रूकडून मिळालेले घाव आहेत, तसेच या प्रोमोशन व्हिडीओमध्ये प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम, फुटबॉलपटू सुनील छेत्री देखील दिसत आहेत

केबीसीचे शूटिंग जवळपास संपले आहे. या शोच्या १४व्या सीझनचा स्पेशल एपिसोड रविवारी प्रसारित होणार आहे. यानंतर, सोमवार ८ ऑगस्टपासून शोचे नवीन भाग दररोज प्रसारित केले जातील. यावेळीही हा शो सोमवार ते गुरुवार या कालावधीत प्रसारित होणार असून शुक्रवारी विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत म्हणूनच या आनंदाच्या प्रसंगी 'कौन बनेगा करोडपती'च्या निर्मात्यांनी एक मोठा स्टॉप जोडला आहे. ज्याच्या अंतर्गत हॉट सीटवर बसलेला व्यक्ती ७.५ कोटींसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही तरी त्याला ७५ लाख मिळतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com