Shehnaaz Gill: शहनाज गिलने दिवंगत सिद्धार्थ शुक्लाला पुरस्कार केला समर्पित, सांगितले खास कारण

शहनाज आणि सिद्धार्थ 'बिग बॉस 13' मध्ये एकत्र दिसले होते. शोमध्येच दोघे चांगले मित्र बनले आणि त्यांच्यात जवळीक वाढली होती.
Shehnaaz Gill dedicated her award to the late Sidharth Shukla
Shehnaaz Gill dedicated her award to the late Sidharth ShuklaSaam TV

Shehnaaz Gill News: शहनाज नुकत्याच पार पडलेल्या दुबईमध्ये फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाली होती. तिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जो तिने सिद्धार्थ शुक्लाला समर्पित केला. याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर ती भावना व्यक्त करत आहेत.

यावेळी शेहनाज म्हणते, 'मी हा पुरस्कार माझे कुटुंब, माझे मित्र आणि माझ्या टीमला अजिबात समर्पित करणार नाही कारण ही माझी मेहनत आहे, आणि तू माझा आहेस आणि नेहमी माझाच राहशील... ठीक आहे.'

'आणखी एक गोष्ट, मला एका व्यक्तीचे आभार मानायचे आहेत. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि माझ्यात इतके इव्हेस्ट केल्याबद्दल धन्यवाद, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. सिद्धार्थ शुक्ला हे तुझ्यासाठी आहे. असे शहनाज म्हणाली. तिचे भाषण ऐकून तिथे बसलेल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. (Shehnaaz Gill)

Shehnaaz Gill dedicated her award to the late Sidharth Shukla
Aindrila Sharma:प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; अवघ्या २४ व्या वर्षी ऐंद्रिला शर्माने घेतला अखेरचा श्वास

शहनाजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे चाहते खूप भावूक झाले आहेत. तसेच या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे की, 'मला माझे अश्रू आवरता येत नाहीत. शहनाज मला तुझा अभिमान आहे. तर दुसर्‍याने लिहिले की, 'तो तिथे असता तर तो तिथे बसून मोठ्याने हसत आणि आनंदाने लाजला असता. तू खूप धाडसी आहेस शहनाज.' (Social Media)

शहनाज आणि सिद्धार्थ 'बिग बॉस 13' मध्ये एकत्र दिसले होते. शोमध्येच दोघे चांगले मित्र बनले आणि त्यांच्यात जवळीक वाढली होती. या शोमध्ये सिद्धार्थ आणि शहनाजच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. शो संपल्यानंतरही दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. असे म्हटले जाते की सिद्धार्थ-शहनाज रिलेशनशिपमध्ये होते आणि लवकरच एकमेकांशी लग्न करणार होते. तथापि, दोघांनी कधीही त्यांच्या नात्याविषयी अधिकृत माहिती दिली नाही आणि नेहमीच स्वतःला खूप जवळचे आणि खास मित्र म्हणून सांगत होते. (Bigg Boss)

तसेच सिद्धार्थ, शहनाजचा भाऊ शाहबाज बादशाहच्याही जवळ होता. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शाहबाजने त्याच्या हातावर सिद्धार्थचा चेहराच्या चेहऱ्याचा टॅटू बनवला आहे. काही महिन्यांपूर्वी, शहनाजचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये ती तिच्या भावाच्या हातावर सिद्धार्थच्या चेहऱ्याच्या टॅटू दिसत होता.

गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचे निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधे घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतरच त्यांची प्रकृती खालावत गेली. शहनाजच्या मांडीवर सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. (Sidharth Shukla)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com