Sidharth Shukla Death: सिद्धार्थनं शेहनाझच्या मांडीवर सोडला जीव?

बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
Sidharth Shukla Death: सिद्धार्थनं शेहनाझच्या मांडीवर सोडला जीव?
Sidharth Shukla Death: सिद्धार्थनं शेहनाझच्या मांडीवर सोडला जीव?Saam Tv

Sidharth Shukla Death: बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या Sidharth Shukla आकस्मिक मृत्यूने संपूर्ण टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. रिअॅलिटी शोमध्ये ओळख झालेली शहनाज गिल Shehnaaz Gill भेटले आणि शोनंतरही दोघे कायम सोबत दिसून येत. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ईटाइम्स ने सांगितले की, सिद्धार्थ शुक्लाने शहनाज गिलच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला.

हे देखील पहा-

काही अभिनेते आणि त्याच्या जवळच्या लोकांनी सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाला त्यांच्या निवासस्थानी त्याच्या शोकसभेवेळी भेट दिली. त्यावेळेस शहनाजला पाहून सर्वांना धक्का बसला आहे. तिला पाहून दिसून येत होते की, सिद्धार्थ आता आपल्यासोबत नाही या वस्तुस्थितीला सामोरे जाण्यास ती सक्षम नाही.

मिळालेल्या वृत्तानुसार, 2 सप्टेंबर रोजी, त्याने अस्वस्थतता वाटात असल्याची तक्रार केली होती. तो रात्री साडेनऊच्या सुमारास घरी आला त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी त्याची आई आणि शहनाज दोघेही घरीच होते.

Sidharth Shukla Death: सिद्धार्थनं शेहनाझच्या मांडीवर सोडला जीव?
छळाला कंटाळून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून

त्याला बरे वाटण्यासाठी आधी त्यांनी त्याला निंबू पाणी आणि नंतर आईस्क्रीम दिले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सिद्धार्थला बरे वाटत नव्हते. यावर त्याची आई आणि शहनाझने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले. तर, सिद्धार्थ झोपू शकला नाही म्हणून त्याने शहनाजला त्याच्याबरोबर राहण्यास सांगितले. आणि तिने फक्त त्याच्या पाठीवर थाप देत त्याच्यासोबत होती. पहाटे 1:30 च्या सुमारास, सिद्धार्थ शहनाजच्या मांडीवर झोपला. यानंतर ती सुद्धा झोपली आणि सकाळी 7 च्या सुमारास जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने सिद्धार्थला कोणत्याही हालचालीशिवाय त्याच स्थितीत झोपलेले पाहिले. आणि जेव्हा तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने कोणतीच हालचाल केली नाही. शहनाज घाबरली आणि 12 व्या मजल्यावरून 5 व्या मजल्यावर गेली जेथे त्याचे कुटुंब राहत होते. तिने सिद्धार्थच्या बहिणीला कळवले आणि त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला आणि त्यांनी येऊन तपासणी करताच, सिद्धार्थ जिवंत नाही असे सांगितले.

स्त्रोतनुसार, सिद्धार्थच्या आकस्मिक निधनाने शहनाज खूप तुटली आहे. शहनाज सिद्धार्थची खूप जवळची मैत्रीण होती आणि तिने अनेकदा त्याच्यावरचे प्रेम उघडपणे दाखवले आहे. तिने खुलेपणाने त्याच्या प्रेमात असल्याचे कबूल केले. बीबी 13 नंतर त्यांच्या जोडीला चाहत्यांनी खूप प्रेम केले आणि त्यांनी त्यांच्यासाठी सिदनाज हे नाव दिले होते.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com