Dance Deewane Juniors : शिल्पा शेट्टी आणि नोरा फतेहीची जुगलबंदी ; कोणी मारली बाजी ?

'डांस दीवाने जूनियर्स' च्या सेटवर नेहमीच काहीना काही गमतीदार किस्से घडतंच असतात.
shilpa shetty and nora fatehi
shilpa shetty and nora fatehisaam tv

मुंबई : रिअॅलिटी शो मध्ये सर्वात जास्त पसंद केल्या जाणाऱ्या कलर्स वाहिनीवरील 'डांस दीवाने जूनियर्स' च्या सेटवर नेहमीच काहीना काही गमतीदार किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा नुकताच या सेटवर घडला जेव्हा, हल्लीच शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या आगामी चित्रपट 'निक्कमा'च्या प्रोमोशनसाठी 'डांस दीवाने जूनियर्स' या कार्यक्रमात 'अभिमन्यु दासानी' आणि 'शर्ली सेट्टा' यांच्यासोबत पाहुणी म्हणून आली होती. या कार्यक्रमामध्ये 'नीतू सिंग' (Neetu singh), 'मर्जी पेस्टिनजी' आणि 'नोरा फतेही' (Nora Fatehi)हे पर्यवेक्षण करत असून 'करन कुन्दरा' (Karan Kundrra)हा सूत्रसंचालन करत आहे. शिल्पा शेट्टी आल्यावर तिचा आणि नोरा फतेहीचा नृत्य सामना रंगला, याचा प्रोमोचा व्हिडीओ निर्मात्यांनी कलर्स वाहिनीच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे.

shilpa shetty and nora fatehi
असं कुठं असतंय व्हय! ८ धावांवर अख्खा संघ गारद, दुसऱ्या ओव्हरमध्येच खेळ खल्लास!

व्हिडीओच्या सुरुवातीला शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Dance) ही काही बाल स्पर्धकांसोबत 'बाबूजी जरा धीरे चलो' या गाण्यावर नाचताना दिसतं आहे. या कार्यक्रमात तिने लाल रंगाचा सुंदर असा 'बोल्ड' ड्रेस घातला आहे. तर नोराने निळ्या रंगाचा हॉट गाऊन घातला आहे. त्या दोघीही नृत्यामध्ये एकमेकींना तोडीस-तोड टक्कर देताना दिसून येत आल्या व त्यांच्या ह्या जुगलबंदीचा नीतू सिंघ आणि मर्जी आनंद घेताना दिसले. शिल्पा शेट्टी ही नंतर स्पर्धक रुंझुनचा भाऊ नियोम सोबत देखील नाचताना दिसली. नियोम हा एका न्यूरोलॉजिकल आजारामुळे पार्शियली-इम्पेयर्ड (कमी दिसणे) या त्रासाने ग्रस्त आहे. नियोमला जज मर्जी , नीतू सिंघ आणि नोरा या तिघांनी एक चष्मा भेट म्हणून दिला.

shilpa shetty and nora fatehi
'अर्जुन तेंडुलकरवर जास्त दबाव टाकू नका', टीम इंडियाचे माजी कर्णधार म्हणाले..

शिल्पाने केलं स्पर्धकांच कौतुक...

कार्यक्रमामध्ये प्रतिक या स्पर्धकाच्या 'सी-कंपनी' या संघाने शिल्पाचं प्रसिद्ध गाणं 'धडकन' वर नृत्य सदर केलं. त्यावर खूश होऊन शिल्पाने त्याचं कौतुक करत म्हणाली , या गाण्याचं सादरीकरण उत्तम होतं , पाळीव प्राण्यांविषयी जागरूकता पसरवणार हे नृत्य होतं आणि या नृत्याची कोरियोग्राफी देखील मला खूप आवडली.

शिल्पा शेट्टीचा आगामी चित्रपट...

शिल्पा शेट्टीचा नुकताच 'हंगामा २' नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात परेश रावल यांनी मुख्य भूमिका केली आहे. तसेच शिल्पाचा आता 'निक्कमा' हा नवीन चित्रपट १७ जुनला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सब्बीर खान याने दिग्दर्शित केला असून या चित्रपटामध्ये 'अभिमन्यु दासानी' हा मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच समीर सोनी हा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com