राज कुंद्रा आणि कंपनीचे हे होते उद्योग; पोलिसांनी दिली माहिती

राज कुंद्रासह त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही मुंबई सत्र न्यायालयाने 23 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
राज कुंद्रा आणि कंपनीचे हे होते उद्योग; पोलिसांनी दिली माहिती
राज कुंद्रा आणि कंपनीचे हे होते उद्योग; पोलिसांनी दिली माहितीSaam tv

सूरज सावंत

मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रासह त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही मुंबई सत्र न्यायालयाने 23 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. हे सर्व जण काय पद्धतीने काम करत होते याची माहिती मुंबईचे सह पोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी आज पत्रकारांना दिली. (How was Raj Kundra and his company working?)

राज कुंद्रा आणि कंपनीचे हे होते उद्योग; पोलिसांनी दिली माहिती
राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

याप्रकरणी पुन्हा एक नवी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२१ मध्ये मालवणी पोलिस स्टेशन मध्ये अश्लील व्हिडिओ संदर्भात गुन्हा नोंदवला होता. यात नवोदित कलाकार विशेषतः महिला कलाकारांना चांगल्या रोलच्या बहाण्याने बोलावून त्यांच्याकडून बोल्ड सिन करवून घेतले जायचे. त्यावर काही महिलांनी आक्षेप घेत पोलिसात तक्रार नोंदवली होती. यात ९ जणांना या पूर्वीच अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या अॅप द्वारे हे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवले जात होते.

या तपासात उमेश कामत ही व्यक्ती इथली प्रमुख होती. तो राज कुंद्राच्या कंपनीत कार्यरत होता. त्याच्या विहान नावाच्या कंपनीचा केमरिन नावाच्या कंपनीशी करार आहे. तो राज याचा नातेवाईक आहे. तर ही कंपनी लंडनची आहे. त्याचं हाॅटशाॅट हे अॅप होतं. या अॅपचं सर्व काम विहान कंपनी कडून मुंबईतून व्हायचं. याप्रकरणी सखोल तपास करताना काही व्हाॅट्स अॅप ग्रुप, ईमेल, अकाऊन्ट शिट सापडल्या आहेत. त्यांनतर न्यायालयाची परवानगी घेऊन कुंद्राच्या घराची झाडाझडती घेतली. त्या आधारावर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com