Video : बसलाच बनवलं जीम; धावत्या बसमध्ये शिल्पाचं वर्कआऊट, चाहते म्हणाले...

Shilpa Shetty Workout Video in the Running Bus goes Viral : योगा, मेडिटेशन अशा कितीतरी व्यायामप्रकारांमुळे वयाच्या ४६ व्या वर्षीही ती एकदम फिट आहे.
Video : बसलाच बनवलं जीम; धावत्या बसमध्ये शिल्पाचं वर्कआऊट, चाहते म्हणाले...
Shilpa Shetty Workout Video in the Running Bus goes Viral Instagram/@theshilpashetty

मुंबई: बॉलिवूडची फिटनेस गर्ल शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासह, तिच्या सुंदरतेसह, तिच्या झीरो फिगरसाठीही प्रसिद्ध आहे. तिच्या परफेक्ट बॉडीशेपसाठी ती जीममध्ये दररोज घाम गाळते. याशिवाय योगा, मेडिटेशन अशा कितीतरी व्यायामप्रकारांमुळे वयाच्या ४६व्या वर्षीही ती (Shilpa Shetty) एकदम फिट आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ (Video) शेयर केला आहे. ज्यात ती धावत्या बसमध्ये वर्कआऊट करत आहे. छोट्याश्या वर्कआऊटनंतर (Workout) बसची साफ-सफाईदेखील केला आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. (Shilpa Shetty's pull-ups, push-ups, lunges inside a bus is perfect fitness inspo)

हे देखील पाहा -

शिल्पाला फिटनेसची खूप आवड आहे आणि ती संधी मिळताच वर्कआउट करण्याची एकही संधी सोडत नाही. आता अलीकडेच शिल्पा शेट्टीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती बसमध्ये व्यायाम करताना दिसत आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

शिल्पा शेट्टीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, शिल्पा रिकाम्या बसमध्ये पुश अप्स करताना दिसत आहे. शिल्पा निळ्या रंगाची डेनिम पँट आणि ब्लेझरमध्ये पुश अप करताना दिसत आहे. यादरम्यान तिचा स्टायलिश लूकही पाहण्यासारखा आहे. व्हिडिओ शेअर करताना ती लिहिते, "सोमवारची प्रेरणा... बस रिकामी असल्याने हे केले. घरी परतताना काही पुल-अप, पुश-अप आणि लंग्ज. 2 मिशन पूर्ण केले. फिट इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान ! " असं तिने लिहिलं आहे.

Shilpa Shetty Workout Video in the Running Bus goes Viral
इंटरनेट स्टार किली पॉलवर जीवघेणा हल्ला, पंतप्रधानांनी केले होते कौतुक

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिल्पाने 'शेप ऑफ यू' होस्ट केले. उन्हापासून बचाव करण्यासाठी त्याने चष्माही लावला होता. शिल्पा असे प्रेरणादायी व्हिडिओ आणि पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने अलीकडेच 'शेप ऑफ यू' नावाचा शो होस्ट केला, ज्यामध्ये तिने अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या. या सेलिब्रिटींनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेसबद्दल सांगितले. शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीत शमिता शेट्टी आणि शहनाज गिल यांचाही समावेश आहे. शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीत शमिता शेट्टी आणि शहनाज गिल यांचाही समावेश आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.