
Shilpa Shetty's 47th Birthday: बॉलिवूड इंडस्ट्रीतील फिट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेली शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ८ जून रोजी ४७ वर्षांची झाली आहे. शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटातून या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाच्या यशानंतर शिल्पा शेट्टीने कधीच मागे वळून पाहिले नाही. प्रोफेशनल लाईफसोबतच शिल्पा शेट्टी तिच्या पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत होती. राज कुंद्रासोबत लग्न होण्यापूर्वी शिल्पा शेट्टीचे नाव या बॉलिवूड सेलिब्रिटींशी जोडले गेले होते.
सलमान खान (Salman Khan);
सलमान खान आणि शिल्पा शेट्टी नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. हे दोघे एकत्र असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, या दोघांनीही कधीही सार्वजनिकरित्या याची कबुली दिली नाही.
अक्षय कुमार (Akshay Kumar);
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या लव्हस्टोरीची संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, नंतर दोघे काही कारणाने वेगळे झाले.
अनुभव सिन्हा (Anubhav Sinha);
या यादीत बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचेही नाव आहे. 'दस' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती असे सांगण्यात येते.
राज कुंद्रा (Raj Kundra);
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर शिल्पा शेट्टीने अखेर तिचा लाइफ पार्टनर म्हणून बिझनेसमन राज कुंद्राची निवड केली. शिल्पा आणि राज यांचे २००९ मध्ये लग्न झाले.
शिल्पा शेट्टी लवकरच 'निकम्मा' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.