Shireen Mirza : मालिकेच्या सेटवरच टीव्ही अभिनेत्री बेशुद्ध होऊन कोसळली, रुग्णालयात दाखल

Shireen Mirza Collapsed : 'ये हैं मोहब्बते'मधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री शिरीन मिर्झा 'धर्मपत्नी' या मालिकेच्या सेटवर अचानक बेशुद्ध झाली.
Shireen Mirza
Shireen Mirza Mirzashireen/Instagram

Shireen Mirza Collapsed : 'ये हैं मोहब्बते'मधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री शिरीन मिर्झा 'धर्मपत्नी' या मालिकेच्या सेटवर अचानक बेशुद्ध झाली. त्यानंतर ती जमिनीवर कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेने सेटवर खळबळ उडाली.

'कलर्स'वरील 'धर्मपत्नी' या मालिकेत शिरीन मिर्झा ही महत्वाची भूमिका निभावत आहे. सेटवरच तिला अस्वस्थ वाटू लागले. ती बेशुद्ध पडली आणि जमिनीवर कोसळली. (Latest News)

Shireen Mirza
Satish Kaushik demise: सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर

रिपोर्टनुसार, टीव्ही अभिनेत्री शिरीन ही धर्मपत्नीचं शूटिंग सुरू असतानाच सेटवर बेशुद्ध पडली. त्यानंतर ती जमिनीवर कोसळली. या घटनेमुळं सेटवर गोंधळ उडाला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जवळच्या मित्रांसह फॉरेन ट्रिप

दरम्यान, ये हैं मोहब्बते या मालिकेतून (TV Serial) प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री शिरीन अलीकडेच आपल्या जवळच्या मित्रांसह फुकेतला गेली होती. तिने फुकेतमध्ये फोटोशूटचा धडाका लावला होता. बरेच फोटो तिने पोस्ट केले होते.

शिरीनने एक व्हिडिओही तिथून शेअर केला होता. तो व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले होते. बिनधास्त अशी ओळख असलेली अभिनेत्री शिरीन आपल्या मित्रांसह फुकेतला गेली होती. तिथे तिने अनेक बोल्ड फोटो काढले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकाही केली होती.

Shireen Mirza
Tu Jhoothi Main Makkar: 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाला झटका; रणबीर-श्रद्धाचा चित्रपट प्रदर्शित होताच झाला लीक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com