श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांतला जामीन मंजूर, रेव्ह पार्टीत झाली होती अटक

सिद्धांतसह अन्य चौघांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त भीमाशंकर गुलेद यांनी दिली.
Siddhanth Kapoor
Siddhanth KapoorSaam Tv

मुंबई - अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ आणि शक्ती कपूरचा (Shakti Kapoor) मुलगा सिद्धांत कपूर याला ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं होत. बंगळुरूच्या रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूरला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मात्र आता सिद्धांत कपूर याला जामीन मिळाला आहे.अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सोमवारी बेंगळुरू पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला, जिथे रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना सुमारे 5 जणांना अटक करण्यात आली. सिद्धांतसह अन्य चौघांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त भीमाशंकर गुलेद यांनी दिली.

रविवारी रात्री बेंगळुरूमध्ये झालेल्या एका पार्टीत सिद्धांतने ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. एम. जी. रोडवरील एका हॉटेलमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी तातडीने या हॉटेवर छापा टाकला. यावेळी पार्टीत हजर असलेल्या लोकांनी ड्रग्ज घेतलं की नाही हे तपासण्यासाठी चाचणी करण्यात आली.

हे देखील पाहा -

या चाचणीत सिद्धांत कपूर याच्यासह इतर सहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनी आधीच ड्रग्जचं सेवन करून हॉटेलमध्ये प्रवेश केला की हॉटेलमध्ये आल्यानंतर ड्रग्ज घेतलं, हे अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या सिद्धात कपूर पोलिसांचा ताब्यात असून या पार्टीत हजर असलेल्या इतरांची चौकशी केली जात आहे. सिद्धांत कपूरने 'शूटआउट अॅट वडाळा' आणि 'अग्ली' सारख्या चित्रपटात काम केले आहे आणि 'ढोल' सारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

Siddhanth Kapoor
कल्याण डोंबिवलीत मुलांच्या लसिकरणाबाबत पालक उदासीन; निम्म्या मुलांचंही लसीकरण नाही

विशेष बाब म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावं उघड झाली होती. त्यावेळी श्रद्धा कपूरसह, रकुल प्रीत सिंग, दीपिका पदुकोण, सारा अली खान या अभिनेत्रींचीही एनसीबीमार्फत चौकशी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com