Shreyas Talpade In Emergency: 'इमर्जन्सी'त अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता; फर्स्ट लूक बघून म्हणाल 'शॉल्लिड'

इमर्जन्सीमधील फर्स्ट लूक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Shreyas Talpade play Role atal bihari vajpayee In Emergency
Shreyas Talpade play Role atal bihari vajpayee In EmergencySAAM TV

मुंबई: बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत हिच्या इमर्जन्सी या सिनेमातील लूक पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. इमर्जन्सी चित्रपट कंगना रनौत हिनं दिग्दर्शित केलंय. तसंच या चित्रपटात ती देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका निभावणार आहे. कंगनाच्या या चित्रपटात माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकारणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. (Shreyas Talpade In Emergency)

Shreyas Talpade play Role atal bihari vajpayee In Emergency
Tiger Shroff-Disha Patani Breakup : टायगर श्रॉफ- दिशा पाटनीचा ब्रेकअप, ६ वर्षे डेटिंगनंतर 'का रे दुरावा'

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana Ranaut) हिचा बहुप्रतीक्षीत सिनेमा इमर्जन्सीचा लूक पोस्टर सध्या धुमाकूळ घालतोय. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेतील कंगना रनौतचा दमदार लूक सर्वांनाच भावला.

त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या लूकचीही जोरदार चर्चा झाली. आता चित्रपटातील आणखी एका भूमिकेवरील पडदा हटवण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता तेही समोर आले आहे.

Shreyas Talpade play Role atal bihari vajpayee In Emergency
Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका! ट्रॅफिक जाम करणे पडले महागात

अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) दिसणार आहे. बुधवारी श्रेयसचा फर्स्ट लूक समोर आला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या भू्मिकेत असलेल्या श्रेयसचा लूक पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले. 'एक सच्चे राष्ट्रवादी, ज्यांचे देशाप्रती असलेले प्रेम आणि अभिमान एक मिसाल होती. जे आणीबाणीच्या वेळी उदयोन्मुख युवा नेते होते,' असे कंगनाने श्रेयसचा फर्स्ट लूक शेअर करताना म्हटलं आहे.

अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदेची कास्टिंग लोकांना खूप आवडली आहे. सुपर्ब, वाह, काय निवड आहे? बेस्ट चॉइस अशा कमेंट करत आहेत. 'इमर्जन्सीसाठी सर्वात चांगला कलाकार आहे,' अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर अटलबिहारी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे धम्माल उडवून देईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया अन्य एका यूजरने दिली. तर श्रेयसला कास्ट केल्यामुळे कंगनाचंही कौतुक होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com