
Siddharth-Kiara Reception Look and Celebrity: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ७ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. राजस्थानातील सूर्यगड पॅलेसवर त्यांच्या शाही विवाहसोहळा पार पडला. दिल्ल्लीत रिसेप्शन केल्यानंतर हे कपल मुंबईत आले. काल या जोडप्याने बॉलिवूडसाठी खास रिसेप्शन आणि पार्टीचे आयोजन केले होते.
सिद्धार्थ-कियाराच्या या रिसेप्शनची सर्वत्र चर्चा आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तर सर्वत्र सिद्धार्थ-कियाराच्या लूकची चर्चा होती. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सिद्धार्थ-कियाराने त्यांचे लग्नासाठी गुलाबी आणि सोनेरी रंग निवडला होता. तर रिसेप्शनसाठी पार्टी फेवरेट ब्लॅक रंगाची निवड केली होती. सिडने शिमरी ब्लॅक सूट घातला होता. तर कियाराने व्हाईट अँड ब्लॅक ड्रेस घातला होता. तिचा हा आऊटफिट मरमेडच्या आकाराच होता. तसेच तिने ऑफबीट जात यावर हिरव्या खड्यांचा आणि हिऱ्यांचा हेवी नेकलेस घातला होता.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नानंतरच्या सर्वच लूकवर चाहत्याचे लक्ष आहे. तसेच त्यांची चर्चा देखील झाली आहे. जैसलमेर विमानतळावरील कियाराचा ब्लॅक ड्रेस असो किंवा दिल्लीतील रिसेप्शनला मॅचिंग केला रेड इंडियन लूक असो. या जोडप्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
सिध्दार्थ आणि कियाराच्या मुंबईमधील रिसेप्शनविषयी बोलायचे झाले तर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्या सगळ्याचे या दोघांनाही स्वतः जाऊन स्वागत केले. अगदी अजय देवगण सुद्धा त्यांच्या या आनंदात सहभागी झाला होता. रिसेप्शन पार्टीमध्ये दोघानांही धमाकेदार डान्स देखील केला.
सिद्धार्थ आणि कियारासह लक्ष वेधलं ते सेलिब्रिटींच्या लूकने. आलिया, भूमी पेडणेकर, क्रिती सेनॉन, दिशा पटानी, राकुलप्रीत सिंग आणि अनन्या पांडे यांच्या स्टनिंग लूकने साऱ्यांचे लक्ष वेधले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.