'ही' ठरली सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट
'ही' ठरली सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्टSaam Tv

'ही' ठरली सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट

सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग

मुंबई - बिग बॉस Big Boss फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे Siddharth Shukla निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याचा मृत्य झाला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. छोट्या परद्यावरचा मोठा अभिनेता म्हणून त्याची ओळख होती. कूपर हॉस्पिटलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.त्याच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर त्याचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत. दरम्यान, सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे देखील पहा -

२४ ऑगस्ट रोजी सिद्धार्थ शुक्लाने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. एक फोटो शेअर करत त्याने सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले होते. त्यात त्याने लिहिले होते की, “सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंटलाइनवर असणे सोपे नाही, परंतु आम्ही आपल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो.

सिद्धार्थ मुंबईतील एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल होता. त्याने २००८ मध्ये 'बाबुल का आंगन ना' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. लव्ह यू जिंदगी, बालिका वधू आणि दिल से दिल तक या मालिकेमधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी आणि बिग बॉस 13 या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्यांचे चाहते आणि चाहते त्यांचे दुःख व्यक्त करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com