सिद्धार्थच्या मृत्यूने फॅनला आली चक्कर; तरुणी रुग्णालयात भरती

‘गुरुवारी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरूवारी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
सिद्धार्थच्या मृत्यूने फॅनला आली चक्कर; तरुणी रुग्णालयात भरती
सिद्धार्थच्या मृत्यूने फॅनला आली चक्कर; तरुणी रुग्णालयात भरतीSaam Tv

मुंबई - ‘गुरुवारी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे Sidharth Shukla गुरूवारी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या अकाली निधनाने टीव्ही इंडस्ट्री मधील त्याचे मित्र आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अवघ्या वयाच्या 40 व्या वर्षीच त्याने जगाचा निरोप घेतला यावर अद्यापही कोणाचाही विश्वास बसत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. सिद्धार्थच्या मृत्यू झाल्याची बातमी ऐकली आणि चक्क त्याची एक फॅन कोमात गेली आहे. खुद डॉक्टरांनी ट्विट Tweet करून याबाबत माहिती दिली आहे.

डॉ. जयेश ठकेरने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थची एक चाहती त्याचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यानंतर डॉक्टरांनी ट्विट करून सिद्धार्थच्या सर्व चाहत्यांना आपली स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवरून त्यांनी मुलीचा एक फोटो शेअर Share केला आहे. त्या संदेश मध्ये ते म्हणत आहेत की, "मित्रांनो, तुमच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोला आणि एकटे राहू नका, सिद्धार्थच्या एका फॅनला काल रात्री वॉशरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कृपया स्वतःची काळजी घ्या...आणि तिच्यासाठी प्रार्थना करा" असं त्यात ते सांगत आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com