Kailash Kher: बागेश्वर बाबाला कैलाश खेरचा पाठिंबा; म्हणाला 'त्यामुळे हिंदू जागे होत आहेत...'

Bageshwar Baba: गायक कैलाश खेर यांनीही धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
Kailash Kher Supported Bageshwar Baba
Kailash Kher Supported Bageshwar BabaSaam Tv

Kailash Kher Supported Bageshwar Baba: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता पद्मश्री गायक कैलाश खेर यांनीही धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. कैलाश खेर यांनी इंदूरमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जिथे ते म्हणाले की, भारत हे आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे, परंतु आता हळूहळू हिंदू जागे होत आहेत. कैलाश खेर त्यांच्या वक्तव्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून धीरेंद्र शास्त्री भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी सातत्याने करत आहेत. दरम्यान, कैलाश खेर एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इंदूरला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय हेही त्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Kailash Kher Supported Bageshwar Baba
Aai Kuthe Kay Karte Video: दुसऱ्या लग्नानंतर अरुंधती भक्तीरसात झाली तल्लीन, सुरेल गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

कार्यक्रमात कैलाश खेर यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मुद्द्यावर आपले म्हणणे मांडताना सांगितले की, धीरेंद्र शास्त्री यांची एकापाठोपाठ एक विधाने ज्या पद्धतीने समोर येत आहेत, त्यामुळे हिंदू जागे होत असल्याचे दिसून येत आहे.

कैलाश खेर यांना जेव्हा विचारण्यात आले की, धीरेंद्र शास्त्री भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा दावा करत आहेत. तेव्हा कैलाश खेर त्यांनी या दाव्याचे समर्थन करत भारत हे आधीपासूनच हिंदू राष्ट्र असल्याचे सांगितले. पुढे कैलाश खेर म्हणाले की, जे मन भारतासाठी समर्पित आहे आणि जे भारताचे आहे ते सनातनचे आहे.

आरआरआर चित्रपटातील नाटु नाटु या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यावर कैलाश खेर म्हणाले की, हे आमचे संस्कार आणि महाकालचा आशीर्वाद आहे, परदेशी लोकही भारतीय संस्कृतीचा आदर करत आहेत.

Kailash Kher Supported Bageshwar Baba
Suniel Shetty: माझ्यामुळे बदलला शाहरुखने 'मैं हूं ना'चा क्लायमॅक्स, १९ वर्षांनंतर सुनीलने स्पष्ट केले कारण

कैलाश खेर जेव्हाही इंदूरला जातात तेव्हा ते पितृश्‍वर हनुमानाच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनाही भेटतात. कैलाश खेर यांनी जसे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे समर्थन केले आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत या संपूर्ण प्रकरणात गायक कैलाश खेर यांच्याबद्दल विरोधात अनेक वाद आणि विधाने समोर येऊ शकतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com