आय लव्ह उद्धव...!; मुख्यमंत्री ठाकरे यांना आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा

तसेच त्यांच्या राजकारणाचे कौतुकही केले आहे.
आय लव्ह उद्धव...!; मुख्यमंत्री ठाकरे यांना आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा
Uddhav Thackeray Saam Tv

मुंबई - शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 42 आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या बंडामुळे आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बॉलीवुडमधून पाठिंबा देण्यात येत आहे.

बॉलीवुडचे प्रसिद्ध गायक लकी अली यांनी फेसबुक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांच्या राजकारणाचे कौतुकही केले आहे. I love Uddhav and I respect his Statesmanship...full stop असे लकी अली यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का; सेनेचे गटनेते अजय चौधरी

शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मान्यता दिली आहे. विशेष बाब म्हणजे याच गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेला हा दावा मान्य करण्यात आला नाही. नियमानुसार आता शिवसेना गटनेता पदावर अजय चौधरी यांनाच मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची नोंद विधिमंडळात झाली असल्याचं समजतंय. शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता शिंदे गट काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Uddhav Thackeray
कृषिमंत्री दादा भुसे आसाममध्ये, आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष द्यावं; राऊतांचे सूचक ट्विट

पर्यायी सरकार देण्यावर भाजपचे एकमत

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मुंबईत दाखल झाले असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पर्यायी सरकार देण्यावर भाजपचे एकमत झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचा आकडा सातत्त्याने वाढत आहे. कालपर्यंत शिवसनेचे ४० आणि अपक्ष १० अशा एकूण ५० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपशी हातमिळवणी करुन शिंदे हे सरकार स्थापन करु शकतात अशा चर्चा सुरु होत्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com