
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती. यावेळी चित्रपटातील कलाकार अजय देवगण, रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी चित्रपटाची मुहूर्त पूजा केली. या कॉप युनिव्हर्समध्ये आता अक्षय कुमारसोबत एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्वेता तिवारी आहे. श्वेता तिवारी देखील चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
नुकतंच श्वेता तिवारीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती आणि चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहे. आता अभिनेत्रीची चित्रपटामध्ये काय पात्र असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्ये तीन सुपर पोलिस दिसणार आहेत. ते सुपर पोलिस म्हणजे, सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशी. यासोबतच ‘सिंघम अगेन’मध्ये करीना कपूरही या चित्रपटात दिसणार आहे. त्यासोबतच दीपिका पदुकोणही लेडी सिंघमच्या भूमिकेत या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.
श्वेता तिवारीने यापूर्वीही रोहित शेट्टीसोबत काम केले आहे. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यासोबतच श्वेताने रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसिरीजमध्येही मुख्य भूमिका साकारली होती. रोहित शेट्टीने गेल्या वर्षी त्या वेबसीरीजची घोषणा केली होती. या वेबसीरीजमध्ये, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉयसह श्वेता तिवारीही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज येत्या २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.