Rowdy Bhati Accident: सोशल मीडिया स्टार रावडी भाटीचे अपघाती निधन, झाडावर कार आदळून मृत्यू

उत्कृष्ट संवाद आणि अभिनयाने सोशल मीडियावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या रावडी भाटी उर्फ ​​रोहित भाटीचा सोमवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाला.
Rowdy Rohit Bhati
Rowdy Rohit BhatiSaam Tv

Rowdy Bhati: उत्कृष्ट संवाद आणि अभिनयाने सोशल मीडियावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या रावडी भाटी उर्फ ​​रोहित भाटीचा सोमवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाला. बीटा-2 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुहारपूर गावातील रस्त्याजवळून त्याची भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. या अपघातात कारमधील अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Rowdy Rohit Bhati
Bollywood Movie Trolled In VFX: चर्चा एका टीझरची; ट्रोल भलत्याच टीझरला, नेटकरी म्हणतात " हनुमान आदिपुरुषपेक्षा..."

अपघाताची माहिती मिळताच रोहितच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या अपघाती निधनाचा शोक व्यक्त केला. बुलंदशहरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बुलंदशहरातील सिकंदराबादचा रहिवासी असलेला रोहित भाटी सोशल मीडियावर रावडी भाटी या नावाने प्रसिद्ध होता. रावडी नोएडामध्ये राहत होता. रविवारी रात्री तो मित्रांसह नोएडाहून घरी परतत होता. मंगळवारी पहाटे ३ वाजता रावडी भाटी त्याच्या दोन मित्रांसह स्विफ्ट कारमधून जात होता. त्याची कार अनियंत्रित होऊन चुहारपूर अंडरपासजवळ झाडावर आदळली.

Rowdy Rohit Bhati
Avatar: The Way of Water new trailer: 'अवतार'च्या नव्या ट्रेलरने चाहत्यांना पडली भुरळ, पाण्यातील जादू पाहण्यासाठी चाहते उत्सुक

बीटा-2 पोलीस स्टेशन प्रभारी अनिल राजपूत यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमींना तातडीने जिम्स रुग्णालयात दाखल केले. रावडी ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात रावडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याचे दोन मित्र मनोज आणि आतिश हे देखील कारमध्ये होते, त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

Rowdy Rohit Bhati
Bhediya Movie Promotion: वरुण धवनच्या 'या' सवयीने क्रिती आहे त्रस्त, म्हणाली 'खूप चंचल...'

रावडी भाटीचे इन्स्टाग्रामवर नऊ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या चाहत्यांनी अनेक खातीही तयार केली आहेत. त्याच्या अभिनयाचे, संवादांचे आणि गाण्यांचे अनेक व्हिडिओज युट्युबवरही आहेत. त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com