
Salman Khan Hugs A Kid At Airport: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपुर्वी वारंवार मिळत असलेल्या धमक्यांमुळे सध्या चर्चेत आहे. त्याच्या धमक्यांच्या फोनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारने अभिनेत्याला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मात्र, असे असून देखील सलमान खान नेहमीच त्याच्या चाहत्यांना मन मोकळेपणाने भेटताना आपण अनेकदा पाहिले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात काल रात्री उशिरा विमानतळावर एक लहान मुलगा भेटायला येत असल्याचे दिसत आहे. मुख्य बाब म्हणजे, सलमान त्याच्यासाठी खास उभा ही राहतो.
सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामध्ये सलमानच्या या साधा सिंपल स्वभावाची चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान मध्यरात्री विमानतळावर सुरक्षारक्षकांसोबत फिरताना दिसत आहे. या व्हिडीओतून सलमानने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. सहज जात असताना, भर गर्दीत सलमानची नजर त्याच्या एका छोट्या चाहत्यावर पडली, तो त्याच्याकडे धावत येत असताना, ही नजर पडली.
त्याला पाहताच सलमान जागीच थांबला आणि तो छोटा चाहता येताच त्याने सलमानला मिठी मारली. सलमाननेही त्याच्या या चाहत्याला मिठी मारली. सध्या या दोघांची ही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सलमानचे आणि त्याचा चाहत्याची चर्चा सुरू आहे. या व्हिडीओच्या खाली अनेक युजर्सने कमेंट करत अभिनेत्याचे कौतुक केले. एक युजर म्हणतो, ‘अभिनेता असावा तर सलमान खान सारखा...’ तर आणखी एक म्हणतो, ‘दयाळू अभिनेता’, तर आणखी एक युजर म्हणतो, ‘शानदार सल्लु भाई, तुमची ही स्टाईलच सर्वांना आवडते. म्हणून तर जगभरात इतके फॅन्स आहेत.’ तर आणखी युजर्स म्हणतो, ‘भाईजानची स्टाईलची हटके’ असे म्हणत त्याचे कौतुक केले.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर आणि सलमानसोबतच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून, सलमान खानला महाराष्ट्र सरकारने Y+ श्रेणी सुरक्षा प्रदान केली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये सलमानला सिद्धू मूसवालाप्रमाणे वागणूक दिली जाईल, असे लिहिले होते. तेव्हापासून सलमानच्या घराच्या बाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, सलमान खानचा ‘किसी की भाई किसी की जान’ हा चित्रपट नुकताच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी, जादू दाखवण्यात असफल ठरला आहे. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’च्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटातून शाहरूख देखील कॅमियो भूमिकेत दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.