'दबंग' गर्ल सोनाक्षीसोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, सलमान खाननं...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत अभिनेता जहीर इक्बाल डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
'दबंग' गर्ल सोनाक्षीसोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, सलमान खाननं...
jaheer iqbal And sonakshi sinhasaam tv

'नोटबुक' सिनेमात पदार्पण करणारा अभिनेता जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) त्याच्या अभिनयापेक्षा एका कथित प्रेमप्रकरणामुळं (love-affairs) चर्चेत आला आहे. जहीर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत (Sonakshi sinha) डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. सोनाक्षी आणि जहीर एकत्र स्पॉट झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. पण जहीरने यापूर्वी त्यांच्या रिलेशनशीपबाबत खुलासा दिला नव्हता. मात्र, जहीरने आता एका मुलाखतीच्या माध्यमातून सोनाक्षीसोबत असलेल्या नात्याबद्दत स्पष्टीकरण दिलं आहे. सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) जहीरला एक महत्वाचा सल्लाही दिला होता.याबाबतही जहीरने त्याच्या चाहत्यांना किस्सा सागितला आहे.

jaheer iqbal And sonakshi sinha
Tata Steel Factory Fire: टाटा स्टीलच्या प्रकल्पात मोठ्या स्फोटानंतर भीषण आग

सलमान खानच्या सिनेमात जहीरचं पदार्पण

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जहीरने म्हटलंय की, माझ्या अफेर्सबद्दल लोकं काय म्हणतात, या गोष्टींचा मला काहीचफरक पडत नाही. फिल्म इंडस्ट्रीत अशा गोष्टी घडतात.बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच या गोष्टींची मला कल्पना होती. बॉलिवूडमध्ये पदार्पण होण्याआधी सलमान खानने मला महत्वाचा सल्ला दिला होता. तसंच जहीरच्या डेब्यू सिनेमाची निर्मिती सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसने केली होती.

"मला काहीच फरक पडत नाही"

माध्यमांशी बोलताना जहीर म्हणाला, आता खूप वेळ झाली आहे, त्यामुळे मला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. तुम्हाला माझ्याबद्दल असाच विचार करायचा असेल तर करा. तुमच्यासाठी हेच चांगलं आहे. तुम्हाला अशा गोष्टींमध्ये आनंद मिळत असेल तर मी सोनाक्षीसोबत आहे. हेच तुमच्यासाठी चांगलं असेल. पण जर तुम्हाला याबाबत वाईट वाटत असेल तर माफ करा.याविषयी विचार करणं सोडून द्या.

jaheer iqbal And sonakshi sinha
रत्नागिरी : दापोलीच्या हर्णे बंदरात बुडाली बोट

"सलमान खानने दिला होता सल्ला"

या सर्व गोष्टी फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहेत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मला हे सगळं माहीत होतं. मला माहितेय कलाकारांना या सर्वे गोष्टींतून प्रवास करावा लागतो. सलमान खानने मला नेहमीच सांगितलं की, अशा गोष्टी घडत राहतात,लोकं टीका करतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नको.त्यामुळे मी आता या गोष्टी गांभीर्याने घेत नाही.

'या' सिनेमात झळकणार जहीर

वर्क फ्रंटचं बोलायचं झालं तर, जहीर इक्बाल त्याचा आगामी सिनेमा डबल एक्सएल मध्ये झळकणार आहे. जहीरसोबत या सिनेमात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत असणार आहेत.सलमान खानचा आगामी सिनेमा कभी ईद कभी दिवाली मध्ये जहीरला कास्ट केलं जावू शकतं, अशा चर्चाही सिनेवर्तुळात रंगल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.