Viral Video: मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी आईने गायलं गाणं; सोनू सूदलाही सुरांची भुरळ, थेट दिली ऑफर

सोनू सूदने त्यांच्या सुरांना दाद देत आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची ऑफर दिली आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video: रातोरात प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोहचण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण आजवर अनेक व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठं नाव आणि संपत्ती कमावली आहे. सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ आता देखील व्हायरल झाला आहे.

एक आईचं असते जी आपल्या मुलांचे सर्व हट्ट पुरवते. आईला आपल्या मुलांच्या जीवनात असलेल्या सर्व अडचणी देखील न सांगता समजतात. अशात आई आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कायमच झटत असते. मात्र आता एका मुलीने आपल्या आईसाठी प्रगतीचं मोठं दार खुलं केलं आहे. सोशल मीडियावर एका आईचा गाणं गातानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे. व्हिडिओ व्हायरल होताच आईला बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याकडून चित्रपटात गाणं गाण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. (Latest Viral Video)

Viral Video
Sonu Sood Fan Moment: सोनू सूदला मिळाले चाहत्याकडून अनोखी भेट, प्रेम पाहून अभिनेता झाला निःशब्द

सध्या या आईचं गाणं ऐकूण नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहूशकता की, एक चिमुकली आईचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. ती आईला गाणं गाण्यासाठी सांगत आहे. मात्र आई आधी नकार देते. त्यामुळे मुलगी आईकडे गाणं गाण्याचा हट्ट करते. त्यावर आई फिर भी मेरा मन प्यासा... हे गाणं गात आहे. तिचा हा व्हिडिओ एका युजरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वच चकित झालेत.

तसचे अभिनेता सोनू सूदने त्यांच्या सुरांना दाद देत आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची ऑफर दिली आहे." तुमचा संपर्क क्रमांक तुम्ही मला पाठवा, माझ्या पुढील चित्रपटासाठी तुम्ही गाणं गा...", असं सोनू सूदने म्हटलं आहे. सध्या या आईचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होतं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com