Keerthy Suresh On Wedding Rumours: अरे बापरे! कीर्ती सुरेश लवकरच करणार लग्न ? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

Keerthy Suresh Wedding: कीर्तीने सोमवारी तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तिच्या लग्नाच्या आणि रिलेशनशिपच्या अफवांना भाष्य केले आहे.
Keerthy Suresh Tweeted On Her Wedding Rumours
Keerthy Suresh Tweeted On Her Wedding RumoursInstagram @keerthysureshofficial

Keerthy Suresh Tweeted On Her Wedding Rumours: तेलुगु पीरियड अॅक्शन-ड्रामा दसरा या चित्रपटात झळकलेली अभिनेता कीर्ती सुरेश सध्या चर्चेत आहे. काही वृत्तांनी दावा केला की ती दुबईस्थित एका व्यावसायिकाशी लग्न झाले आहे. सोमवारी, कीर्तीने ट्विटरवर यावर स्पष्टीकरण दिले आहे.

कीर्तीचे रिअल इस्टेट व्यावसायिक फरहानशी लग्न झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्यावर व्हायरल झाल्या आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कीर्तीच्या वैयक्तिक आयुष्याविषयीच्या बातम्या याआधीही समोर आल्या होत्या. एका प्रसिद्ध एंटरटेन्मेंट पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री तिच्या शाळेतील मित्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. (Latest Entertainment News)

Keerthy Suresh Tweeted On Her Wedding Rumours
Vikram Responds To Anurag Kashyap: 'केनेडी'वरून अनुराग कश्यप-चियान विक्रममध्ये ट्विटर वॉर; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अभिनेत्रीने ट्विट करता यावरची अपडेट शेअर केली आहे. कीर्तीने सोमवारी तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तिच्या लग्नाच्या आणि रिलेशनशिपच्या अफवांना भाष्य केले आहे. अभिनेत्रीने स्पष्ट म्हटले आहे की मीडियाच्या अर्ध्या भाजलेल्या पोळ्या आणि अनुमानांमध्ये काहीच तथ्य नाही. तिने पुढे सांगितले की जेव्हाही तिला लग्न करावेसे वाटेल तेव्हा ती तिच्या 'मिस्ट्री मॅन'बद्दल नक्की सांगेल.

दुबईस्थित बिझनेसमन फरहानसोबतच्या तिच्या रिलेशनशिपविषयी अफवांवर प्रतिक्रिया देताना कीर्तीने ट्विटरवर लिहिले, "हाहाहा!! माझ्या प्रिय मित्रांनो यावेळी हे इतकं खेचण्याची गरज नव्हती! मला जेव्हा वाटेल तेव्हा मिस्ट्री मॅन कोण आहे सांगेन. तोपर्यंत टेक अ चिल पिल!"

दरम्यान, कीर्ती सुरेश मारी सेल्वाराज दिग्दर्शित तिच्या आगामी 'मामनन' या चित्रपटासाठी उत्सुक आहे. राजकीय थ्रिलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मामननमध्ये वादिवेलू, फहाद फासिल, उदयनिधी स्टॅलिन आणि कीर्ती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Red Giant Movies द्वारे निर्मित, हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. Netflix ला या चित्रपटाचे ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिकार मिळाले आहेत. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

मेहर रमेश दिग्दर्शित भोला शंकरमध्ये कीर्ती दिसणार आहे. या चित्रपटात ती चिरंजीवीच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com