Actor Sarath Babu Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा! 5 दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याचं निधन

South Star Sarath Babu: अभिनेते सरथ बाबू यांचे सोमवारी हैदराबादमध्ये निधन झाले.
South Star Sarath Babu Death
South Star Sarath Babu Death Saam TV

Sarath Babu Died: विविध भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये मुख्य आणि सहाय्यक भूमिका साकारणारे अभिनेते सरथ बाबू यांचे सोमवारी हैदराबादमध्ये निधन झाले. ते काही काळ हैदराबादमधील रुग्णालयात ऍडमिट होते.

३ मे रोजी त्यांच्या मृत्यूबद्दलच्या अफवा पसरल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळून लावले आणि ते रिकव्हर होत असल्याची माहिती दिली. सोमवारी अभिनेत्याचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. सरथ बाबू यांना सेप्सिसचे निदान झाले होते, त्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती.

सरथ बाबू यांची प्रकृती खालावल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी बंगळुरूहून हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र नंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवावे लागले. सोमवारी म्हणजेच 22 मे रोजी सकाळी सरथ बाबूच्या शरीराच्या अवयवांनी काम करणे बंद केले. (Latest Entertainment News)

South Star Sarath Babu Death
Jr Ntr Fans Burn Firecrackers In Theater: ज्युनियर एनटीआर बर्थडेला चाहत्यांनी थिएटर पेटवलं; व्हिडिओ व्हायरल

सरथ बाबू यांची कारकीर्द

सेप्सिसमुळे सरथ बाबू यांची किडनी, यकृत आणि फुफ्फुसावर परिणाम झाला होता. सेप्सिस हा एक गंभीर रोग आहे, ज्यामुळे अनेक अवयव निकामी होऊ शकतात. या आजारात जीवही जाऊ शकतो. अहवालानुसार, सरथ बाबूच्या संपूर्ण शरीरात सेप्सिस पसरला होता आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Actor)

सरथ बाबू यांचे खरे नाव सत्यम बाबू दीक्षितुलु होते. तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही काम केले. सरथ बाबू यांनी 1973 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट 'राम राज्यम' होता.

तेव्हापासून सरथ बाबू यांनी 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये वसंता मुल्लाई हा सरथ बाबू यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. सरथ बाबू हे डबिंग आर्टिस्ट देखील होते आणि त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सरथ बाबू यांना 9 वेळा नंदी पुरस्कार मिळाला होता.

कशी झाली अभिनयाची सुरूवात ?

सरथ बाबू यांनी द हिंदु वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा शेअर केला होता, “लोकांनी माझ्या आईला सांगितले की तिचा मुलगा सुंदर आहे आणि त्याने चित्रपटात काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझे वडील याच्या विरोधात होते पण आईने मला साथ दिली.

मी तेव्हा असा विचार केला की, अयशस्वी झालो तर आमचा कौटुंबिक व्यवसायात सांभाळेन. माझ्या मनात माहित होते की मी व्यवसाय किंवा राजकारण करू शकत नाही. मी एका चित्रपटासाठी नवीन चेहऱ्यांसाठी पेपरमधील जाहिरातीला उत्तर दिले आणि मी अपेक्षेपेक्षा अधिक सहजतेने ऑडिशन पार पाडले.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com