
थलापती विजयाचा आगामी चित्रपट 'लिओ' प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपट यावर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट असणार आहे. ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शन सुरू झाले आहे.
चित्रपटाच्य ऑडिओ लॉंचआधी निर्माते चित्रपटाविषयी बझ क्रिएट करत आहेत. १७ सप्टेंबरपासून पुढील ४ दिवस चित्रपटाचे वेगवेगळे पोस्टर वेगवगेळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे 'लिओ' चित्रपटाचे पहिले पोस्टर काल तेलुगूमध्ये प्रदर्शित झाले. तर नुकतेच या चित्रपटाचे कन्नड पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर तेलुगू पोस्टरपेक्षा फार वेगळे आहे. तेलुगू पोस्टरमध्ये विचारात असलेला विजय बर्फात पाळताना दाखविण्यात आला होता.
थलापती विजयच्या 'लिओ' चित्रपटाच्या कन्नड पोस्टरमध्ये बंदुकीत अभिनेत्याला दाखविण्यात आले आहे. तर रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती दिसत आहे. यावरून चित्रपट एक क्राईम थ्रिलर चित्रपट असणार आहे हे निश्चित झाले आहे. या पोस्टरवर 'Keep Calm And Plot Your Escape' (शांत राहा आणि तुमचा मार्ग निवड) असे लिहिले आहे. (Latest Entertainment News)
लोकेश कनागराज यांनी हा चित्रपट लिहिला असून चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे. चित्रपटामध्ये थलापती विजय डबल रोल साकारणार आहे. गँगस्टर वर्ल्डवर हा चित्रपट अवलंबून आहे.
'लिओ' चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे आगामी पोस्टर हिंदीमध्ये प्रदर्शित होईल अशी सगळे अपेक्षा करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.